news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home पिंपरी चिंचवड ‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!

‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई; आरोपीकडून १००% दागिने जप्त | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महिला पीजीमध्ये घरफोडी करणाऱ्या प्लंबरकडून ६.६५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त; बावधन पोलिसांची धडक कारवाई!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: महिलांच्या पीजी (PG) मध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका प्लंबरच्या बावधन पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून ६ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. राकेश यशवंत दाते (वय ३३ वर्षे, रा. काळेवाडी फाटा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्लंबरचे नाव आहे.

सुसगाव येथील ‘स्टांजा लिव्हिंग अवीव’ (किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे, पाषाण-सुस रोड) येथे राहणाऱ्या मयुरी बाबासाहेब पवार (वय ३२) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:४५ ते २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या रूमचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले तक्रारदार व त्यांच्या मैत्रिणीचे (पूजा जाधव) सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.नं. ५३१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५) दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.  पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, पोलीस शिपाई दत्तात्रेय शिंदे आणि सुहास डंगारे यांनी पीजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले.  तांत्रिक तपासासह गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित चोरटा काळेवाडी फाटा परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच पोलीस हवालदार अतिश जाधव, दत्तात्रेय शिंदे व सुहास डंगारे यांनी काळेवाडी फाटा परिसरात सापळा रचून संशयित राकेश दाते याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडून चोरीचे सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

सदरची यशस्वी कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (हिंजवडी विभाग) विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पो.उ.नि. राजेंद्र काळे, स.पो.फौ. बापूसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार फारूक मुल्ला, अतिश जाधव, अरुण नरळे, तसेच पोलीस शिपाई सुहास डंगारे, ऋषीकेश पाटील, दत्तात्रेय शिंदे आणि अक्षय लाटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!