news
‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!‘सीसीटीव्ही अन् खबऱ्यांचे जाळे’; महिलांच्या पीजीमधील चोरीचा बावधन पोलिसांकडून अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!‘३० सेकंदांत १६ हजार फूट खाली आलेले विमान सावरले’; मुंबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला देश सलाम!‘महाराष्ट्राचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर शिक्कामोर्तब!‘उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य घडवावे’; रावेतच्या पीसीसीओईआर महाविद्यालयात आवाहन!
Home पिंपरी चिंचवड ‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!

‘समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला अन् काळ बनून आला प्रवाह’; दिवेआगार दुर्घटनेने आळंदी शहरावर पसरली शोककळा!

४२ विद्यार्थ्यांसह गेली होती सहल; पिंपरी-चिंचवड पोलीस व रायगड प्रशासन संपर्कात, पालकांचा आक्रोश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आळंदीवर दुःखाचा डोंगर; दिवेआगार समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसर हादरला!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

आळंदी: श्रीक्षेत्र आळंदी परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगार समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच आळंदी आणि परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’चे ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक हे रायगड व दिवेआगार परिसरात सहलीसाठी गेले होते. गुरुवारी दुपारी दिवेआगार येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ८ विद्यार्थी खोल पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांपैकी तन्मय वाहिले, सुमित अहिरे आणि कौस्तुभ दौंड यांची नावे निष्पन्न झाली असून, उर्वरित विद्यार्थ्यांची नावे शोधण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आळंदीतील अनेक पालकांनी व नातेवाईकांनी तातडीने श्रीवर्धन आणि दिवेआगाराकडे धाव घेतली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप नायकरे व मृत विद्यार्थ्यांचा मित्र प्रणव येवले यांनी दिली.

या दुर्दैवी घटनेनंतर आळंदीतील नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आळंदी-दिघी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) योगेश रांजणकर यांनी सांगितले की, “दिवेआगार समुद्र दुर्घटनेप्रकरणी आम्ही रायगड पोलीस आणि जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहोत. पालकांनी व नागरिकांनी संयम बाळगावा. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या तसेच ‘विनर्स अकॅडमी’ बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याचे निष्पन्न झाल्यास अकॅडमी प्रशासनाविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”

एकाच वेळी ८ उगवत्या तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे आळंदीतील वातावरण अत्यंत भावूक आणि तणावपूर्ण बनले आहे. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमधून प्रचंड हळहळ व्यक्त होत असून सहलींच्या आयोजनावर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!