news
Home पिंपरी चिंचवड ‘नवे गडी, नवे राज्य’! दादा भोसले सरांच्या युवा टीमने कासारवाडी चषकावर कोरले नाव; शहराच्या क्रिकेट विश्वात कौतुक

‘नवे गडी, नवे राज्य’! दादा भोसले सरांच्या युवा टीमने कासारवाडी चषकावर कोरले नाव; शहराच्या क्रिकेट विश्वात कौतुक

प्रतिकूल परिस्थितीतही नव्या दमाची टीम उभी करून टेनिस बॉल स्पर्धेत बाजी; १६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'श्री नंदन स्वामी समर्थ क्रिकेट क्लब'चा शानदार विजय. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“मोडला नाही कणा!”- नव्या शिलेदारांच्या बळावर क्रिकेट गुरुवर्य दादा भोसले यांनी जिंकला ‘कासारवाडी चषक २०२५’!

 

कर्णधार लखन कदम यांच्या नेतृत्वात ‘श्री नंदन स्वामी समर्थ क्रिकेट क्लब’ चिंचवडचा दणदणीत विजय; शहराच्या क्रिकेट विश्वात कौतुक.

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

गेली दोन दशकांहून अधिक काळ पिंपरी-चिंचवड शहराला शेकडो कसदार क्रिकेटर देणारे क्रिकेट गुरुवर्य दादा भोसले यांनी आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा आपली ओळख सिद्ध केली आहे. ऐनवेळी काही जुने शिष्य आणि शिलेदार त्यांना सोडून गेले असतानाही, “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा” या उक्तीप्रमाणे गुरुवर्य दादा भोसले यांनी आपला कणा आणि क्रिकेटप्रतीची निष्ठा कधीच मोडू दिली नाही.

दादा भोसले सरांनी नवीन दमाची नवीन टीम उभी करून १६ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या कासारवाडी चषक २०२५ या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ती खेळवली आणि ‘नवे गडी नवे राज्य’ प्रस्थापित केले. त्यांच्या या नव्या शिलेदारांनी चषकावर आपले नाव कोरले.

गुरुवर्य “दादा भोसले” यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार “लखन कदम” यांच्या शानदार नेतृत्वात कासारवाडी येथे आयोजित केलेल्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये “श्री नंदन स्वामी समर्थ क्रिकेट क्लब” चिंचवड संघाने दणदणीत विजय प्राप्त करून पारितोषिक पटकावले.

प्रतिकूलतेवर मात करत मिळवलेल्या या विजयाबद्दल शहरातील क्रिकेट विश्वात दादा भोसले सर आणि त्यांच्या टीमचे जोरदार कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. हा विजय म्हणजे सरांनी त्यांच्या प्रत्येक पठ्ठ्याला जिंकण्यासाठीच घडवले, या त्यांच्या क्रिकेट गुरू म्हणून असलेल्या बाण्याची प्रचितीच आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!