news
‘मुंडे साहेबांचे’ सामाजिक न्यायाचे कार्य प्रेरणादायी! रहाटणीच्या छत्रपती चौकात लोकनेत्याला वंदन‘अधिकाऱ्यांनीच नोंदणी करण्यास नकार द्यायला हवा होता!’ पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांचे मोठे विधान‘बाबू गेनूं’चे शौर्य स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक दिशा देणारे! वयाच्या २२ व्या वर्षी दिलेल्या बलिदानाला महापालिकेकडून अभिवादनगरजू नागरिकांना घराची मालकी मिळणार! अमरावतीत ५००० पेक्षा जास्त अतिक्रमणे नियमात; ‘प्रधानमंत्री आवास’ आणि ‘रमाई’ योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळाहिंजवडीत हॉटेल भाड्यावरून वाद पेटला! जयहिंद अर्बन बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला; सराईत आरोपी सुमित संदानशिवला जामीन नाकारला
Home पिंपरी चिंचवड जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विशेष प्रावीण्यप्राप्त संस्था, व्यक्तींचा होणार सन्मान

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विशेष प्रावीण्यप्राप्त संस्था, व्यक्तींचा होणार सन्मान

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त ममता शिंदे आणि सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन; दिव्यांग कल्याणकारी योजनांवर मार्गदर्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिव्यांगांना मिळणार नवी दिशा! ३ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांसह नवीन योजनांचे उद्घाटन

 

चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात यूडीआयडी कार्ड दुरुस्ती केंद्रासह मार्गदर्शन; प्रावीण्यप्राप्त संस्था, व्यक्तींचा होणार सन्मान; आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या विशेष दिनानिमित्त दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नवीन योजनांचे उद्घाटन, विविध उपक्रम आणि नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा, तसेच विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या दिव्यांग नागरिक आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.

समाज विकास विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त ममता शिंदे, तसेच दिव्यांग भवन फाउंडेशनच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप:

  • सकाळची सत्र (१० ते दुपारी १२): दिव्यांग बांधवांसाठी यू.डी.आय.डी. कार्ड (UDID Card), आधार कार्ड आणि रेशन कार्ड दुरुस्ती केंद्र सुरू राहणार आहे.

  • दुपारची सत्र (दुपारी १२ ते सायंकाळी ७): यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.

  • मार्गदर्शन आणि सन्मान: यावेळी दिव्यांगांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनांचे उद्घाटन होणार आहे. तसेच, दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याणकारी योजना, उद्योग उभारणी आदी विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी सांगितले की, “पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सर्व सुविधा व संधी उपलब्ध करून देणे आणि समावेशक समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.

सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांनी या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!