news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home अकोला नाकाबंदीत रंगेहात पकडला तस्कर! दहिहांडा पोलिसांकडून दोन गोवंशांना जीवदान; अमरावती जिल्ह्यातील आरोपीवर गुन्हा दाखल

नाकाबंदीत रंगेहात पकडला तस्कर! दहिहांडा पोलिसांकडून दोन गोवंशांना जीवदान; अमरावती जिल्ह्यातील आरोपीवर गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करीचे रॅकेट उघड! नाकाबंदीत टाटा मॅजिकसह दोन गोवंश जप्त; पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दहिहांडा पोलिसांचा मोठा दणका. | @ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


दहिहांडा पोलिसांची धाडसी कारवाई! कत्तलीसाठी नेले जाणारे गोवंश वाचवले; २.२० लाखांच्या मुद्देमालासह आरोपी अटकेत


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे,२५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन क्राईम डायरी:

अकोला : अकोला जिल्ह्यातील दहिहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तत्परता दाखवत दोन गोवंशांना जीवदान दिले आहे. गुप्त माहितीच्या आधारे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नाकाबंदी करून, पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे वाहतूक करणारी एक टाटा मॅजिक गाडी पकडली. या कारवाईत पोलिसांनी दोन गोवंश आणि वाहनासह एकूण २,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दहिहांडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अनंत मुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद दळवी हे परिसरात गस्त घालत होते. यावेळी दर्यापूरकडून दहिहांडाकडे येणाऱ्या एका संशयास्पद टाटा मॅजिक गाडीला (क्रमांक MH 30 AB 0688) थांबवून झडती घेतली असता, त्यात दोन गोवंश अत्यंत निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

जप्त केलेला मुद्देमाल:

१. दोन गोवंश: अंदाजे किंमत २०,०००/- रुपये.

२. टाटा मॅजिक वाहन: किंमत २,००,०००/- रुपये.

एकूण जप्त मुद्देमाल: २,२०,०००/- रुपये.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जुनेद खान सत्तार खान (वय ३०, रा. टाटानगर, दर्यापूर, जि. अमरावती) याला ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोवंशांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दहिहांडा पोलीस स्टेशनमध्ये ‘प्राणी संरक्षण अधिनियमा’ंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिहांडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, स.फौ. अनंत मुळे आणि पो.कॉ. प्रमोद दळवी यांनी केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!