news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्याला तुरुंगवास! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्याला तुरुंगवास! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

पुणे न्यायालयाचा दणका! ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे पडले महागात; अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात भोसरी पोलिसांनी केली होती कारवाई. मद्यपी चालकांना पोलिसांचा कडक इशारा; नियम मोडल्यास आता थेट कारावासाची हवा खावी लागणार. | @ २०२६ | मॅक्स मंथन गुन्हे विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ महागात! भोसरीतील तळीराम चालकाला १५ दिवसांच्या कोठडीसह १० हजारांचा दंड; पुणे न्यायालयाचा दणका


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन गुन्हे विशेष:

पिंपरी : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एका ३४ वर्षीय इसमाला पुणे येथील मोटार वाहन न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. आरोपीला १५ दिवस साधा कारावास आणि एकूण १३ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईद्वारे मद्यपी चालकांना कडक इशारा दिला आहे.

३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा (००:५३ वा.) आरोपी आपल्या ताब्यातील वाहन (क्रमांक: MH 14 FM 1342) घेऊन भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह परिसरातून मद्यधुंद अवस्थेत जात होता. भोसरी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दगडे यांनी त्याला अडवून त्याची वैद्यकीय चाचणी केली असता, तो मद्याच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले.

त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ आणि १८४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात पाठवण्यात आले होते.

आज, २८ मार्च २०२६ रोजी या प्रकरणाची सुनावणी न्यायदंडाधिकारी वर्ग १ (मा. श्री. पाटील साहेब) यांच्यासमोर झाली. वैद्यकीय चाचणीचा नमुना पुरावा म्हणून ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

१. कलम १८५ (ड्रंक अँड ड्राईव्ह): १५ दिवस साधा कारावास आणि १०,००० रुपये दंड. (दंड न भरल्यास अतिरिक्त १० दिवस कारावास).

२. कलम १८४ (धोकादायक वाहन चालवणे): ३,००० रुपये दंड. (दंड न भरल्यास ५ दिवस साधा कारावास).

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी या निकालाचे स्वागत केले असून नागरिकांना आवाहन केले आहे की:

“मद्यप्राशन करून वाहन चालवणे केवळ स्वतःसाठीच नाही, तर रस्त्यावरील इतर निष्पाप नागरिकांच्या जिवासाठीही धोकादायक आहे. अशा प्रकरणांत पोलीस आणि न्यायालय कठोर भूमिका घेणार आहेत, त्यामुळे नियमांचे पालन करा.”


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!