news
Home पिंपरी चिंचवड आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी! पाहा कोणते रस्ते राहतील बंद

आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी! पाहा कोणते रस्ते राहतील बंद

पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांचे आदेश; जड वाहनांना निगडी परिसरात प्रवेशबंदी, मिरवणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढण्यात येणार आहेत. विशेषतः पिंपरी आणि दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

पोलीस उप-आयुक्त (वाहतूक शाखा) विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत. हे बदल १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० ते रात्री २४.०० वाजेपर्यंत किंवा मिरवणुका संपेपर्यंत लागू राहतील.


अ. क्र. बंद असणारा मार्ग (प्रवेश बंदी) पर्यायी मार्ग
लोकमान्य हॉस्पिटल चौक ते महावीर चौक (सर्व वाहने) लोकमान्य हॉस्पिटल चौकातून डावीकडे वळून दळवीनगर मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
रिव्हर व्ह्यू चौक (चिंचवड) ते महावीर चौक (जड वाहने) चिंचवड फार्म मार्गे वाल्हेकरवाडी, रावेत मार्गे मुंबईकडे किंवा बिजलीनगर, भक्ती-शक्ती चौक मार्गे भोसरीकडे जाता येईल.
बसवेश्वर चौक ते महावीर चौक (सर्व वाहने) केएसबी चौकातून येणारी वाहने बसवेश्वर चौकातून सायन्स पार्क मार्गे इच्छित स्थळी जातील.
महावीर चौक ते डॉ. आंबेडकर चौक (पिंपरी) (सर्व वाहने) १. डी-मार्ट समोरील ग्रेड सेपरेटर मार्गे. २. डी-मार्ट पंक्चर येथून डाव्या बाजूने ऑटो क्लस्टर मार्गे.
नाशिक फाटा ते डॉ. आंबेडकर चौक (पिंपरी) (सर्व वाहने) १. डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर किंवा खराळवाडी ग्रेड सेपरेटरमधून हायवेने. २. कृष्णा हॉटेल येथून डावीकडे वळून साई चौकामार्गे.
नेहरू नगर चौक ते एच. ए. कॉर्नर (रहिवाशांशिवाय इतर वाहने) नेहरूनगर चौकातून वल्लभनगर किंवा नेहरूनगर अंतर्गत मार्गाचा वापर करावा.
रसरंग चौक ते एच. ए. कॉर्नर/पिंपरी चौक (सर्व वाहने) रसरंग चौकातून एच. ए. कॉर्नरकडे येणारी वाहतूक डावीकडे वळून नेहरूनगर चौकामार्गे जाईल.
सम्राट चौक ते मोरवाडी चौक (सर्व वाहने) रसरंग चौकाकडून येणारी वाहतूक सम्राट चौकातून उजवीकडे वळून जुन्या मोरवाडी कोर्ट मार्गे जाईल.
PCMC आऊटगेट ते डॉ. आंबेडकर चौक (सर्व वाहने) गांधीनगर कॉर्नर मार्गे एच. ए. कॉर्नरकडे जाता येईल.
१० सायन्स पार्क ते मोरवाडी चौक (सर्व्हिस रोड) सायन्स पार्क/ऑटो क्लस्टर कडून येणारी वाहतूक जिजामाता चौक आणि मदर तेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे जाईल.
११ क्रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल (सर्व वाहने) मोरवाडी चौकातून क्रोमाकडे जाणारी वाहने पिंपरी पूल मार्गे इच्छित स्थळी जातील (या दिवशी पुलावर दुतर्फा वाहतुकीस परवानगी असेल).
१२ गोकुळ हॉटेल ते डॉ. आंबेडकर चौक (सर्व वाहने) ही वाहतूक पिंपरी पूल मार्गे इच्छित स्थळी वळवण्यात आली आहे.
१३ हॅरिस ब्रिज ते फुगेवाडी चौक (सर्व्हिस रोड) हॅरिस ब्रिजने ग्रेड सेपरेटर मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
१४ बोपोडी संविधान चौक ते दापोडी शिवाजी पुतळा हॅरिस ब्रिज दापोडी अंतर्गत मार्गे जाता येईल.
१५ शीतलादेवी चौक ते दापोडी गाव शीतलादेवी चौकातून सांगवी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
१६ जुनी सांगवी PMPML बस स्टॉप ते दापोडी या मार्गावरील नदी पुलावरून दापोडीकडे येण्यास बंदी आहे.

देहूरोड, चाकण आणि मोशी परिसरातील बदल
  • देहूरोड: शीतलनगर, शिवाजी विद्यालय, जामा मशीद आणि स्वामी चौक परिसर वाहतुकीसाठी बंद राहील. वाहनधारकांनी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल – सेंट्रल चौक या अंतर्गत मार्गांचा वापर करावा.

  • चाकण: चाकण चौक ते महात्मा फुले चौक आणि नेहरू चौक रस्ता बंद राहील. वाहनधारकांनी माणिक चौक – मेदनकरवाडी किंवा तळेगाव चौक – आंबेठाण चौक मार्गाचा वापर करावा.

  • मोशी: नाशिक हायवेवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक (मोशी) कडे येण्यास बंदी आहे. वाहतूक भारतमाता चौकामार्गे वळवण्यात आली आहे.

  • निगडी: भक्ती-शक्ती ओव्हर ब्रिजवरून पिंपरीकडे येणाऱ्या जड वाहनांना बंदी असून, ही वाहतूक अंकुश चौक – त्रिवेणीनगर – केएसबी चौक – भोसरी मार्गे वळवण्यात आली आहे.

सूचना: अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, अग्निशमन दल इ.) यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!