news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा श्वास मोकळा होणार! कंपन्यांनी बुजविलेल्या नाल्यांची होणार चौकशी

पिंपरीत पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा श्वास मोकळा होणार! कंपन्यांनी बुजविलेल्या नाल्यांची होणार चौकशी

अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे संकेत; एमआयडीसी आणि महापालिकेची संयुक्त पाहणी होणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

एमआयडीसीतील अतिक्रमित नाल्यांचा आयुक्तांकडून आढावा; पावसाळ्यापूर्वी नाले पूर्वस्थितीत आणण्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: एमआयडीसी परिसरातील नैसर्गिक नाले बुजविणे किंवा त्यावर अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असून, यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी महापालिका आणि एमआयडीसीने संयुक्त पाहणी करून अतिक्रमित नाले ओळखावेत आणि ते तात्काळ पूर्वस्थितीत आणावेत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

सोमवारी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित बैठकीत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी एमआयडीसी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला.

आयुक्त म्हणाले की, शहरातील एमआयडीसी परिसरातील जुन्या नकाशांमध्ये अनेक नाले दर्शविले आहेत. मात्र, कालांतराने अनेक कंपन्यांनी हे नाले बुजविले आहेत किंवा त्यावर अतिक्रमणे केली आहेत. यामुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळित होऊन पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. याचा फटका केवळ उद्योगांनाच नाही, तर सामान्य नागरिकांनाही बसतो. त्यामुळे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करणे अनिवार्य आहे.

  • संयुक्त पाहणी: एमआयडीसी अधिकारी, महापालिका अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून बुजविलेले नाले व पाणी साचणारी ठिकाणे निश्चित करावीत.

  • पर्यायी व्यवस्था: ज्या ठिकाणी जुने नाले पूर्वस्थितीत आणणे शक्य नाही, तिथे तातडीने पर्यायी ‘स्टॉर्म वॉटर लाईन’ टाकण्याची कार्यवाही करावी.

  • कंपन्यांना सूचना: ज्या कंपन्यांनी नाल्यांवर अतिक्रमण केले आहे, त्यांना ते स्वतःहून काढून घेण्याबाबत कळविण्यात यावे.

  • समन्वय: आगामी पावसाळा लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवावी.

या बैठकीस एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, कार्यकारी अभियंता संजय कोतावाड, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!