news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार! स्थायी समितीकडून विविध विकासकामांच्या निविदांना हिरवा कंदील

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार! स्थायी समितीकडून विविध विकासकामांच्या निविदांना हिरवा कंदील

पाणीपुरवठा पाइपलाईन आणि रस्ते दुरुस्तीसह सुरक्षा रक्षकांच्या मानधनासाठी सभापती अभिषेक बारणे यांची मंजुरी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा व विकासकामांसह विविध विषयांना मान्यता

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थायी समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत:

बिजलीनगर, बळवंतनगर, रस्टन कॉलनी (प्रभाग १७), दापोडी, तसेच सांगवी परिसरातील जुन्या पाईपलाईन बदलून नवीन टाकण्याच्या कामाला मंजुरी दिली. सेक्टर २३ निगडी येथील केंद्रात नवीन ऑटो-क्लोरीनेशन सिस्टीम बसविणे आणि क्लोरीन गॅस खरेदीसाठी मान्यता देण्यात आली.थेरगाव गावठाण, रहाटणी, पिंपरी आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध भागांतील जलनिस्सारण नलीकांचे नूतनीकरण व दुरुस्ती केली जाईल.

 प्रभाग ६ मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, लांडगेवस्ती यांसह विविध भागांतील रस्त्यांचे ऑटोमेटेड सर्वेक्षणानुसार डांबरीकरण करण्यात येईल. पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसरात फुटपाथ व पेव्हिंग ब्लॉक दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. काळेवाडीतील ज्योतिबा गार्डनमध्ये कुस्ती आखाडा आणि पिंपळे निलख येथे महिला बाजार हट केंद्र उभारले जाणार आहे.

 महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत शाळांना इंटरनेट बँडविड्थ सेवा पुरविली जाईल. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासोबत करार करून २१८ सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात आवश्यक स्थापत्य विषयक कामे केली जातील.

कोट:

“शहराच्या वाढत्या गरजांनुसार नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि शिक्षणासह महत्त्वाच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देत शहराच्या सर्व भागांचा विकास करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!