news
पिंपरी पालिकेचा अजब कारभार! खासगी संस्थेला १ कोटींचा निधी, पण पालिकेच्याच यशवंतराव चव्हाण स्मारकाची दुरवस्थापरीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी! ‘महाटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली; ‘नीट’ परीक्षेमुळे परीक्षा परिषदेचा मोठा निर्णयअपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल! ‘पीएम राहत’ योजनेतून दीड लाखांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचारमहापौर थेट सायकलवरून पोहोचले महापालिकेत! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर रवि लांडगे यांचा अनोखा पुढाकारपिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सूर-ताल घुमला! ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून भव्य नागरी सत्कार
Home पिंपरी चिंचवड पिंपरीच्या ‘वायसीएम’ रुग्णालयाचा कायापालट होणार! स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे ॲक्शन मोडवर; केली थेट पाहणी

पिंपरीच्या ‘वायसीएम’ रुग्णालयाचा कायापालट होणार! स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे ॲक्शन मोडवर; केली थेट पाहणी

वॉर्डांमधील त्रुटी दूर करून इमारतीचा विस्तार करण्याचे निर्देश; रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरीच्या ‘वायसीएम’ रुग्णालयाचा कायापालट होणार! स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे ॲक्शन मोडवर; केली थेट पाहणी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आज रुग्णालयाचा सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत त्रुटी दूर करून सामान्य रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

अभिषेक बारणे यांनी रुग्णालयातील सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या समवेत चौथ्या मजल्यावरील वॉर्डची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेताना त्यांनी वॉर्डातील अत्यावश्यक सोयी, वैद्यकीय उपकरणांची स्थिती आणि लिफ्टच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेतली.

 लिफ्ट दुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता, तातडीने कार्यवाही करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्याचे आदेश त्यांनी दिले. रुग्णालयावर वाढणारा रुग्णांचा भार विचारात घेता, परिसरातील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करून इमारतींचा विस्तार करण्याच्या शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या. रुग्णालयातील टॉयलेट स्वच्छता, बेडची उत्तम व्यवस्था आणि सुरळीत पाणीपुरवठा यांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्युत विभाग आणि अग्निशमन यंत्रणेची सुरक्षाविषयक मानके तपासून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

रुग्णालयातील औषध साठा आणि वैद्यकीय उपकरणांच्या साठवणूक (स्टोरेज) विभागाची पाहणी करताना सभापती बारणे यांनी औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. सामान्य रुग्णांना वेळेवर औषधे मिळतील आणि कोणत्याही उपकरणाच्या अभावी उपचार थांबणार नाहीत, यासाठी योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

“सामान्य नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे. वायसीएम हे शहरातील महत्त्वाचे रुग्णालय असून येथील सेवा दर्जेदार राखण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. या पाहणी दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करून प्रलंबित विकासकामांना गती दिली जाईल.”

— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!