news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस, २७ ठिकाणी झाडे कोसळली; अग्निशमन दलाची कामगिरी कौतुकास्पद

पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस, २७ ठिकाणी झाडे कोसळली; अग्निशमन दलाची कामगिरी कौतुकास्पद

निगडी, भोसरी, चिंचवडसह विविध भागांत वाहतूक विस्कळीत; जवानांनी कटरने तात्काळ फांद्या हटवून रस्ते केले मोकळे | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा हाहाकार; दोन दिवसांत २७ ठिकाणी झाडे उन्मळून पडली! अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर रस्ते मोकळे

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात तब्बल २७ ठिकाणी अजस्त्र झाडे आणि त्यांच्या मोठ्या फांद्या कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. मात्र, माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने (Fire Department) अत्यंत तत्परतेने संबंधित ठिकाणी धाव घेत ही झाडे बाजूला केली आणि वाहतुकीसाठी रस्ते त्वरित मोकळे करून दिले.

महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२१: एकूण १२ ठिकाणी झाडे पडली.  ४ जुलै २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत): एकूण १५ ठिकाणी झाडे कोसळली. एकूण   २७ घटना शहरात घडल्या आहेत

३ जुलै चिंचवडगाव येथील चापेकर चौक, भोसरीतील इंद्रायणी नगर, पिंपरी येथील मोरवाडी कोर्ट परिसर, निगडीतील सेक्टर २२ व यमुनानगर, फुगेवाडी येथील अशोक हॉटेल परिसर, काळेवाडीतील भारती हॉस्पिटल परिसर, प्राधिकरणातील पूर्णानगर आणि पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक या विविध भागांत झाडे उन्मळून पडली. ४ जुलै निगडी पोलीस स्टेशन परिसर, पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड, त्रिवेणी नगर (निगडी), किवळे गावठाण येथील स्वामी समर्थ मंदिर परिसर, भोसरीतील गुळवे वस्ती, इंद्रायणी नगर व चक्रपाणी वसाहत, खराळवाडी (पिंपरी), मोशी येथील आरटीओ ऑफिस परिसर, कासारवाडीतील शास्त्रीनगर व नाशिक फाटा, दापोडीतील टिळक हॉटेल परिसर, आकुर्डी येथील खंडोबा माळ आणि चिंचवड येथील केशवनगर परिसरात झाडपडीच्या घटनांची नोंद झाली.

झाडपडीच्या घटनांमुळे अनेक मुख्य रस्त्यांवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या सहाय्याने तात्काळ झाडांचे ओंडके आणि फांद्या कापून बाजूला केल्या. यामुळे संभाव्य मोठी वाहतूक कोंडी टळली असून सर्व मार्ग सुरळीत करण्यात आले आहेत.

पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी रस्त्यावरून प्रवास करताना किंवा वाहने पार्क करताना मोठ्या व जुन्या झाडांच्या परिसरात आवश्यक ती खबरदारी बाळगावी. तसेच, शहरात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!