news
Home पिंपरी चिंचवड पाणी नाही, अभ्यास नाही अन् आजारपणाचा फेरा! मोहननगरमधील वीजकोंडीवरून मारुती भापकर यांनी महावितरणला धरले धारेवर

पाणी नाही, अभ्यास नाही अन् आजारपणाचा फेरा! मोहननगरमधील वीजकोंडीवरून मारुती भापकर यांनी महावितरणला धरले धारेवर

रोहित्र सर्वेक्षण अन् नवीन वीज वाहिन्या टाका; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची महावितरणकडे आक्रमक मागणी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वारंवारच्या वीज खंडिततेमुळे मोहननगर, आकुर्डी परिसर त्रस्त! महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात मारुती भापकर आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले,२७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील मोहननगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, विद्यानगर आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि काळभोरनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. महावितरणच्या गलथान, नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभारामुळे स्थानिक रहिवाशांना अतोनात शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे धारेवर धरत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मारुती भापकर यांनी महावितरणचे भोसरी विभागीय मुख्य कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाणे आणि थरमॅक्स चौक उपविभागीय उपकार्यकारी अभियंता विलास शिर्के यांना पाठवलेल्या निवेदनात महावितरणच्या कारभाराची पोलखोल केली आहे. वारंवार वीज ये-जा करत असल्यामुळे नागरिकांचे महागडे टीव्ही, फ्रीज, एसी यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक होत आहेत.  रात्रीच्या वेळी तास न् तास वीज घालवली जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आधीच दिवसाड पाणीपुरवठा केला जातो. ज्या दिवशी पाणी येते, नेमके त्याच दिवशी वीज गायब राहत असल्याने सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पाण्याच्या टाक्या भरता येत नाहीत. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  रात्रीच्या वेळी ५-५ तास बत्ती गूल राहत असल्याने डासांचा उपद्रव वाढला असून लहान मुले व नागरिक डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर आजारांना बळी पडत आहेत. तसेच अंधाराचा फायदा घेऊन परिसरात चोऱ्या-माऱ्यांचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढले आहे.

नागरिकांच्या या सर्व समस्यांचा पाढा वाचत मारुती भापकर यांनी प्रशासनासमोर अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. परिसरातील सर्व ट्रान्सफॉर्मरचे तातडीने सर्वेक्षण करून ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी भाराचे (लोड) योग्य विभाजन करावे. आवश्यक तिथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत. तसेच ट्रान्सफॉर्मर व फिडर बॉक्सच्या सुरक्षेसाठी पत्र्याचे कव्हर, सुरक्षा भिंत आणि आजूबाजूला वाढलेले गवत-वृक्षवेली साफ कराव्यात. फिडर बॉक्स आणि एलटी भूमिगत ३०० चौ.मीमी., २४० चौ.मीमी. लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांचे सर्वेक्षण करून जुन्या झालेल्या सर्व तारा व वाहिन्या काढून नवीन टाकाव्यात. ज्या विद्युत पोलवर प्रमाणापेक्षा जास्त वीज कनेक्शन दिले आहेत, तिथे नवीन पोल उभारून भार कमी करावा. या विभागात वाढलेल्या लोकसंख्येनुसार आणि नवीन समाविष्ट क्षेत्राचा विचार करता महावितरणकडे कर्मचारी व शिडी गाड्यांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे तातडीने अतिरिक्त कर्मचारी व गाड्या उपलब्ध कराव्यात.

“यापूर्वीही आम्ही या संवादासाठी आणि समस्येच्या निवारणासाठी अनेकदा लेखी निवेदने दिली, आंदोलने केली. प्रशासनाने दरवेळी फक्त आश्वासनांची खैरात केली, मात्र कारभारात काहीही सुधारणा झाली नाही. या मागण्या थेट नागरिकांच्या जीविताशी निगडित आहेत. महावितरणने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर नागरिकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा महावितरणच्या विरोधात तीव्र आणि अभूतपूर्व आंदोलन छेडले जाईल!”

— मारुती साहेबराव भापकर (सामाजिक कार्यकर्ते, चिंचवड)

यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत मारुती भापकर यांनी महावितरणला प्रशासकीय भाषेत चांगलाच कानपिळला आहे. आता महावितरणचे अधिकारी यावर काय ठोस कारवाई करतात, की पुन्हा एकदा नागरिकांना मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

वारंवारच्या वीज खंडिततेमुळे मोहननगर, आकुर्डी परिसर त्रस्त! महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात मारुती भापकर आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

महावितरणच्या नियोजनशून्य कारभारावर मारुती भापकर यांचा हल्लाबोल; चिंचवड, आकुर्डी परिसरातील वीज समस्यांवर मुख्य अभियंत्यांना दिला अल्टिमेटम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

पाणी नाही, अभ्यास नाही अन् आजारपणाचा फेरा! मोहननगरमधील वीजकोंडीवरून मारुती भापकर यांनी महावितरणला धरले धारेवर

रोहित्र सर्वेक्षण अन् नवीन वीज वाहिन्या टाका; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची महावितरणकडे आक्रमक मागणी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!