news
Home अमरावती युवा पिढीला AI तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

युवा पिढीला AI तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती युवा महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ; २५ डिसेंबरला मेळघाट महोत्सवात युवकांना संधी देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती युवा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन!

अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: युवा पिढीला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध कौशल्ये आत्मसात करता यावीत, तसेच त्यांना गती असणाऱ्या क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवराष्ट्र युथ फाउंडेशनच्या वतीने सायन्स कोर मैदानावर आयोजित तीन दिवसीय ‘अमरावती युवा महोत्सवा’चे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, नवराष्ट्र युथ फाउंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींची प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे. राज्य शासनाने एआय (AI) आधारित तंत्रज्ञानावर विशेष भर दिला असून युवकांसाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. अमरावती व राज्यातील युवकांनी यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना त्यांनी एआयच्या सदुपयोगावर भर देऊन दुरुपयोगापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. तसेच येत्या २५ डिसेंबर रोजी चिखलदरा येथे होणाऱ्या मेळघाट महोत्सवात युवकांना संधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
प्रास्ताविक नवराष्ट्र युथ फाउंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील यांनी केले. २३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने, युथ पार्लमेंट, गरबा नाईट, स्टार्टअप एक्सपो स्पर्धा आणि अमरावती गॉट टॅलेंट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!