news
Home पिंपरी चिंचवड ३४ ज्येष्ठ सभासदांचा सहभाग; श्री वरदविनायक गणपतीच्या दर्शनाने आणि भजनांच्या गजराने सहलीला सुरुवात

३४ ज्येष्ठ सभासदांचा सहभाग; श्री वरदविनायक गणपतीच्या दर्शनाने आणि भजनांच्या गजराने सहलीला सुरुवात

आरोग्य तपासणी, पंचकर्म अन् निरोगी जीवनशैलीचे धडे; पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य उपक्रम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाची खोपोली येथील माधवबागमध्ये आरोग्य सहल उत्साहात संपन्न!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले  , दि. २३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील ताणतणावातून विरंगुळा मिळावा आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता यावी, या उद्देशाने पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खोपोली येथील प्रसिद्ध माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयात एकदिवसीय आरोग्य सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सहलीमध्ये एकूण ३४ महिला व पुरुष ज्येष्ठ सभासदांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.

दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता शितोळेनगर येथील गणपती चौक येथून ट्रॅव्हल्स बसने सहलीला सुरुवात झाली. पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करताना महिला सभासदांनी पारंपरिक भक्तिगीते आणि भजने सादर केल्याने संपूर्ण प्रवासात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. : सर्वप्रथम अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील श्री वरदविनायक गणपतीचे सर्व सभासदांनी भावुक वातावरणात दर्शन घेतले. त्यानंतर गरमागरम पोहे आणि चहाचा आस्वाद घेत सर्वजण खोपोली येथील माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयाकडे रवाना झाले.

माधवबाग येथे पोहोचल्यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांची मोफत व सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब (Blood Pressure), रक्तातील साखर (Diabetes Check) आणि ईसीजी (ECG) यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश होता. तसेच पंचकर्म, योग्य आहार पद्धती, नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैली कशी जगावी, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व सभासदांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ही आरोग्य सहल ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघ्या ७०० रुपये या माफक व सवलतीच्या दरात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नाश्ता, दोन वेळचा चहा आणि दुपारच्या सात्त्विक जेवणाचा समावेश होता. “वय वाढले तरी उत्साह कमी होत नाही; आनंदी आणि निरोगी राहणे हीच खरी संपत्ती आहे,” अशी प्रातिनिधिक भावना यावेळी ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केली.

ही सहल यशस्वी पार पाडण्यासाठी पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाशराव देशमुख, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, तसेच प्रतिनिधी रोकडेउदार यांनी विशेष परिश्रम घेतले. तर प्रवासातील भजनांच्या कार्यक्रमासाठी शैलाताई लोंढेशैलजाताई बांगर यांनी पुढाकार घेतला. सायंकाळी ६ वाजता परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास सर्व ज्येष्ठ नागरिक सुखरूप सांगवीत परतले. या उपक्रमाबद्दल पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनील मधुकर पोकरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!