news
‘माझ्या लाइफचं सोल्युशनच नाही’ ते यूट्यूबवरील शेवटचा व्हिडिओ; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने राज्य हादरले!शेतकरी आणि गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री विजय यांची विधानसभेत घोषणा; दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध सुरूक्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी कामगारांकडून आदरांजली; कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात सामाजिक व संघटन पर्व अधिक बळकटब्लास्टिंगमुळे कचऱ्याचा डोंगर खचण्याची भीती; उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी१४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्च २०२६ अखेर पावणेतीनशे कोटींच्या ठेवी अन् १ कोटी ७१ लाखांचा नफा जाहीर
Home औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) ‘माझ्या लाइफचं सोल्युशनच नाही’ ते यूट्यूबवरील शेवटचा व्हिडिओ; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने राज्य हादरले!

‘माझ्या लाइफचं सोल्युशनच नाही’ ते यूट्यूबवरील शेवटचा व्हिडिओ; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने राज्य हादरले!

छत्रपती संभाजीनगरमधील ट्रिपल सुसाईड प्रकरणाला नवे वळण; नातेवाइकांवर गंभीर आरोप, पोलिसांकडून फॉरेन्सिक चौकशी सुरू | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना; आत्महत्या करण्यापूर्वी संगीता चांदगुडे यांचे व्हिडिओ समोर!

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी  दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील तिसगाव टेकडीवरून उडी मारून पती, पत्नी आणि मुलाने एकत्र आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एक नवीन आणि गंभीर वळण आले आहे. मृत्यूपूर्वी ४८ वर्षीय संगीता मुरलीधर चांदगुडे यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेले काही व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये त्यांनी नातेवाइकां कडून होणारा मानसिक छळ आणि संपत्तीच्या वादातून कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

यूट्यूबवर २९ हजारांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या संगीता चांदगुडे यांनी घटनेच्या आदल्या दिवशी एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये त्या भावुक होऊन म्हणाल्या होत्या:
“आपलं प्रेम आणि त्याग अशाच माणसाला द्या, ज्याला त्याची किंमत आहे. जर समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाची, कष्टाची किंमत करत नसेल, तर अशा माणसांसाठी काहीही करण्यात अर्थ नाही.”
यानंतर समोर आलेल्या इतर व्हिडिओंमध्ये त्यांनी पतीच्या बहिणीसह काही नातेवाइकां वर गंभीर आरोप केले आहेत. नातेवाइकांनी पती मुरलीधर आणि मुलगा कुणाल यांच्यात गैरसमज पसरवून फूट पाडली, सतत शिवीगाळ केली आणि भावाचे कुटुंब मोडण्याचा प्रयत्न केला, असा दावा संगीता यांनी केला आहे. तसेच, कुटुंब जोडता आले नाही तर संपत्तीत हिस्सा मागून छळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या घटनेच्या सुरुवातीच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षांचा मुलगा कुणाल याने नवीन ‘आयफोन’ (iPhone) फोनसाठी हट्ट धरला होता.  पती मुरलीधर हे पेशाने चालक (Driver) असून घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी फोन घेण्यास असमर्थता दर्शवली. या वादातून नाराज झालेला कुणाल शुक्रवारी सकाळी तिसगाव येथील टेकडीवर गेला आणि उडी मारण्याच्या तयारीत होता.  माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. सुमारे तीन तास कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता.  दुपारी १ च्या सुमारास वडील मुरलीधर मुलाला पकडण्यासाठी पुढे गेले असता कुणालने उडी मारली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांचाही समतोल सुटला आणि दोघे खाली कोसळले. हे दृश्य पाहून टेकडीवर उभ्या असलेल्या आई संगीता यांनीही क्षणाचाही विचार न करता तिथून खाली उडी घेतली. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

 

घटनेनंतर आता संगीता चांदगुडे यांचे व्हिडिओ समोर आल्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तपासाची दिशा व्यापक केली आहे.
केवळ फोनचा वाद होता की त्यामागे नातेवाइकांचा मानसिक छळ आणि संपत्तीचा वाद कारणीभूत होता, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. व्हिडिओंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ते फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!