news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चोरावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; २ चोरीच्या गाड्यांसह १९ वर्षीय तरुण जाळ्यात!

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चोरावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; २ चोरीच्या गाड्यांसह १९ वर्षीय तरुण जाळ्यात!

संत तुकाराम नगर आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहने जप्त; गुन्हे शाखा युनिट १ कडून धडक कारवाई | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ ची धडक कारवाई; सराईत वाहन चोराला ठोकल्या बेड्या, २ गुन्हे उघड!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / निगडी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने वाहन चोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबवून एका सराईत चोराला गजाआड केले आहे. या कारवाईमुळे संत तुकाराम नगर आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीचे २ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून ९० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस पथक हद्दीमध्ये सोनसाखळी (चेन) चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्त घालत होते. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भिसे आणि पोलीस शिपाई तेजस भालचिम यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपीची माहिती मिळाली.

प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे नाव कृष्णा सुरेंद्र प्रजापती (वय १९, धंदा – मजुरी, रा. गुरुद्वारा कॉलनी, भोकन वस्ती, कलवड, लोहगाव, पुणे). जप्त माल ९०,०००/- रुपये किमतीच्या होंडा कंपनीच्या दोन ॲक्टिव्हा (मोपेड) गाड्या. उघडकीस आलेले गुन्हे१. संत तुकाराम नगर पोलीस ठाणे: गु.र. क्र. ३५२/२०२६ (BNS ३०३(२)) , २. निगडी पोलीस ठाणे: गु.र. क्र. ५५४/२०२६ (BNS ३०३(२)) अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भिसे, पोलीस हवालदार महादेव जावळे (ब.नं. ९७७), पोलीस हवालदार शिवराम भोपे (ब.नं. १७४६) आणि पोलीस कॉन्स्टेबल तेजस भालचिम (ब.नं. ३०५६) यांच्या पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!