news
‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!‘प्रत्येक पात्र फेरीवाल्याला कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवून देणार’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ग्वाही!‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘स्वच्छतेसोबतच पुनर्वापराची संस्कृती रुजवणे काळाची गरज’; फुलेनगरमधील सुशोभीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

‘स्वच्छतेसोबतच पुनर्वापराची संस्कृती रुजवणे काळाची गरज’; फुलेनगरमधील सुशोभीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून यशस्वी उपक्रम; नगरसदस्या वर्षा जगताप व अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुनर्वापरातून साधला सौंदर्याचा नवा आविष्कार; फुलेनगरमधील कचरा टाकण्याच्या ठिकाणाचे झाले आकर्षक सुशोभीकरण!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: शहरातील वारंवार कचरा साठणारी ठिकाणे (गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट – GVP) कायमस्वरूपी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून फुलेनगर परिसराचे रूपडे पालटले आहे.

या उपक्रमांतर्गत ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २० मधील डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, फुलेनगर येथील वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणाचे टाकाऊ वस्तूंच्या कल्पक आणि कलात्मक पुनर्वापरातून एका अत्यंत आकर्षक स्थळात रूपांतर करण्यात आले आहे. निरुपयोगी वस्तूंना सौंदर्यदृष्टीची जोड देत नवे रूप बहाल करण्यात आल्याने कचऱ्याच्या जागी आता सौंदर्याची नवी निर्मिती पाहायला मिळत आहे. यातून परिसराचे सुशोभीकरण होण्यासोबतच कचरा व्यवस्थापन, पुनर्वापराचे महत्त्व आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे.

या अभिनव उपक्रमाबाबत बोलताना मान्यवरांनी स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.

“शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे हा पर्यावरणपूरक आणि अभिनव उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेसोबतच पुनर्वापराची संस्कृती विकसित होण्यास मदत होईल.” – महापौर रवी लांडगे

“वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे कायमस्वरूपी रूपांतर करण्यासाठी केवळ स्वच्छता पुरेशी नाही, तर त्या ठिकाणांचा सकारात्मक वापर आणि सौंदर्यीकरणही महत्त्वाचे आहे. शहरातील इतर अशा ठिकाणीही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यावर भर देण्यात येत आहे.” – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

“या ठिकाणांवर पुन्हा कचरा साचू नये, यासाठी परिसराचे सुशोभीकरण, नियमित स्वच्छता आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता महापालिकेला सहकार्य करावे.” – उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसदस्या वर्षा जगताप, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे तसेच महापालिकेचे अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकाऊ वस्तूंमधून साकारलेले हे सौंदर्यपूर्ण परिवर्तन शहरातील स्वच्छता मोहिमेला नवी दिशा देणारे ठरत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!