news
‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!‘प्रत्येक पात्र फेरीवाल्याला कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवून देणार’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ग्वाही!‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!

‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!

आरक्षित भूखंड आणि सार्वजनिक पदपथ मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर आता हातोडा; अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे कारवाईला गती देण्याचे कडक निर्देश!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृहात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील बागवानी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक उपस्थित होते.

महापालिकेच्या मालकीच्या व आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करावेत आणि पुढील आठवड्यात प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग आणि बीट निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सार्वजनिक पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची नियमित मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी सुरू असलेली प्राथमिक कामे, विशेषतः ‘फुटिंग’ची (पायाभरणी) कामे यांची तातडीने पाहणी करून संबंधित ठिकाणांची यादी तयार करावी आणि नियमानुसार ती पाडण्याची कारवाई प्रस्तावित करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत शहरात अनधिकृत बांधकामे झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांनी या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, असे निर्देशही सांडभोर यांनी दिले. शहरातील अनेक इमारतींमध्ये पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेचा अनधिकृतपणे व्यावसायिक वापर केला जात आहे. बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अशा प्रकरणांमध्ये याच आठवड्यात कारवाई पूर्ण करावी, असे सक्त आदेश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील अतिक्रमणधारक आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांना मोकळे रस्ते व पदपथ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!