news
‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!‘प्रत्येक पात्र फेरीवाल्याला कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवून देणार’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ग्वाही!‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!

‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!

एमआरटीपी कलम ३७ अन्वये आरक्षण बदलाचा प्रस्ताव; मोशीतील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या मौनावरही उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशीतील ३७ एकर आरक्षण रद्द करून संस्था लाटण्याचा घाट? महापालिकेच्या भूखंडफेरीविरोधात मारुती भापकर आक्रमक; जनहिताचे डीपी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील (DP) मोशी येथील अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आरक्षण बदलून ते एका खाजगी संस्थेलाघशात घालण्याचा गंभीर घाट घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केला आहे. मोशी येथील गट क्रमांक ३२७ मधील तब्बल १५ हेक्टर (सुमारे ३७ एकर) आरक्षित जागा एका आदिवासी आश्रम शाळेसाठी देण्याच्या हालचाली सुरू असून, याविरोधात मारुती भापकर यांनी महापौर, आयुक्त आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पत्र लिहून हा प्रस्ताव महापालिका सभेत बहुमताने फेटाळून लावण्याची जोरदार मागणी केली आहे.

मोशी येथील गट क्रमांक ३२७ (जुना गट क्र. ३२५) मधील १५ हेक्टर म्हणजेच सुमारे ३७ एकर जागेवर मंजूर विकास योजनेत (डीपी) आरक्षण क्रमांक १/२१० अन्वये ‘रिक्रिएशनल कॉम्प्लेक्स’ (मनोरंजन संकुल) आणि ‘जलाशय’ असे सार्वजनिक हिताचे महत्त्वाचे आरक्षण आहे. मात्र, हे दोन्ही सार्वजनिक आरक्षणे पूर्णपणे वगळून ही बहुमूल्य जमीन ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आदिवासी आश्रम शाळा, चिंचवड’ या संस्थेच्या निवासी शैक्षणिक संकुलासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जात आहे.

याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ अन्वये विकास योजनेत फेरबदल करून ही जागा ‘मागास जमातीसाठी निवासी शैक्षणिक संस्था’ या प्रयोजनासाठी समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

याविषयी तीव्र आक्षेप नोंदवताना मारुती भापकर यांनी पत्रात म्हटले आहे की, “या संबंधित संस्थेचा आजपर्यंतचा कार्यपट तपासला तर शंभर-दीडशे विद्यार्थीदेखील या संस्थेत नसतात. या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी पीएमआरडीए, महाराष्ट्र शासन किंवा गायरान जमिनीमधून एक-दीड एकर जागा देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करायला हरकत नाही. मात्र, मोशीच्या करदात्या नागरिकांच्या हक्काचे सार्वजनिक आरक्षण रद्द करून कोटींच्या कोटींची ही बहुमूल्य जमीन अशा पद्धतीने लाटणे अत्यंत चुकीचे आहे.”

“पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र राज्यात आणि देशात अशा अनेक संस्था आदिवासी व मागासवर्गीय समाजासाठी शैक्षणिक कार्य करत आहेत. उद्या इतर संस्थांनीही अशीच मागणी केली, तर आपण महापालिकेतील जनहिताचे आरक्षण रद्द करून प्रत्येकाला जागा देणार का?” असा संतप्त सवाल भापकर यांनी उपस्थित केला आहे.

मोशी परिसरातील नागरिकांनी यापूर्वी कचरा डेपोचा विरोध केला होता. आता स्थानिक नागरिकांच्या हिताचे व मनोरंजनाचे असलेले सार्वजनिक आरक्षणच पद्धतशीरपणे रद्द केले जात असताना, मोशी गावातील नगरसेवक आणि स्थानिक नागरिक शांत का बसले आहेत, असा मोठा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकवणार आहे,“ अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत मोशीच्या करदात्या नागरिकांवर अन्याय करणारा हा आरक्षण बदलाचा प्रस्ताव महापालिका सभेने बहुमताने फेटाळून लावावा, अशी आक्रमक मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

आगामी २० नोव्हेंबरच्या महापालिका सभेत या प्रस्तावावरून मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या संपूर्ण प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!