news
‘शहराच्या विकासापेक्षा राजकीय तडजोडी आणि सोयीचे राजकारण’; २० नोव्हेंबरच्या तिन्ही सर्वसाधारण सभांकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष!‘प्रत्येक पात्र फेरीवाल्याला कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवून देणार’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांची ग्वाही!‘दिवाळीच्या सुट्टीत उभारलेल्या अनधिकृत बांधकामांची होणार झाडाझडती’; पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा आक्रमक पवित्रा!‘करदात्या नागरिकांच्या हक्काची कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रकार खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना इशारा!‘लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; भटक्या श्वानांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष चालणार नाही’; उपमहापौर बाबर आक्रमक!
Home अकोला ‘हरिनाम आणि संस्कारांच्या संगमातून बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास’; मुर्तिजापुरातील तिडके नगर श्रीराम मंदिरात दीपोत्सव व शिबिराची सांगता!

‘हरिनाम आणि संस्कारांच्या संगमातून बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास’; मुर्तिजापुरातील तिडके नगर श्रीराम मंदिरात दीपोत्सव व शिबिराची सांगता!

नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सोहळा; वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुर्तिजापुरात अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न; संस्काराच्या शिदोरीने बालमन समृद्ध होते — आमदार हरीश पिंपळे

मुर्तिजापूर जयकुमार चर्जन, दि. १८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुर्तिजापूर: मुर्तिजापूर येथील तिडके नगर येथील श्रीराम मंदिर येथे संपन्न झालेल्या अध्यात्मिक बाल संस्कार अनिवासी शिबिराला परिसरातील बालकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरिनाम, कीर्तन, संगीत आणि संस्कारांच्या त्रिवेणी संगमातून हा सोहळा अत्यंत अविस्मरणीय ठरला. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात लहान मुलांवर चांगले संस्कार घडवणे, त्यांच्यात अध्यात्माची आवड निर्माण करणे आणि नैतिक मूल्यांची रुजवण करणे ही काळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हरीशभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी केले.

ह.भ.प. गुरुवर्य श्री. संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प. तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या आशीर्वादाने ६ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दहा दिवसांच्या या संस्कार पर्वात बालकांना अध्यात्म, संत साहित्य, वारकरी संप्रदायाची परंपरा, हरिपाठ, अभंग, कीर्तन, प्रार्थना, शिस्त, सदाचार, आई-वडिलांचा आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व विविध उपक्रमांतून समजावून सांगण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन आमदार हरीशभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या हस्ते झाले. अशा शिबिरामुळे बालमन संस्काराच्या शिदोरीने समृद्ध होते, असे विचार त्यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हर्षलभाऊ रामेश्वर साबळे होते, त्यांनीही अशा प्रकारच्या संस्कार शिबिरांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.

याप्रसंगी ह.भ.प. डॉ. भास्करराव कौलखेडे, डॉ. हरीश पातोंड, नगरसेवक गजानन नाकट, राम खंडारे, राहुल पाटील, पंकज कांबे, समाजसेवक प्रमोद टाले, विष्णू लोडम, ह.भ.प. अजाबराव महाराज वहिले, ह.भ.प. दास पुंडलिक महाराज, ह.भ.प. अरविंद दादा पोकळट, गजानन पा. वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेले संगीत व कीर्तनाचे प्रशिक्षण होय. ह.भ.प. श्री. गणेश महाराज पाटील (अजनी) आणि ह.भ.प. विष्णू महाराज गावंडे (आळंदीदेवाची) यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायातील संगीत परंपरेची ओळख करून दिली. अभंग, भजन, कीर्तन आणि वाद्यसंगीताच्या माध्यमातून बालकांमध्ये भक्तिभाव आणि कलागुणांना उत्तम वाव मिळाला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये वारकरी संप्रदायातील मंडळी, सेवाभावी कार्यकर्ते आणि दात्यांचे मोलाचे योगदान लाभले. दररोजच्या अल्पोपहाराची व सांगता प्रसंगी महाप्रसादाची व्यवस्था अशोक कोथळकर, प्रमोद पोळकट, प्रकाश कौलखेडे, विनोद इंगोले, गजानन चौधरी, किशोर डागा, ज्ञानेश ताले, गजानन पोळकट, भानुदास गुलाबराव मुळे यांनी केली, तर चेतन अरुणराव सदार यांनी पिण्याच्या पाण्याची सुंदर सुविधा उपलब्ध करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन यशस्वी करण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी व संजय पखाले, दिपक बावनेर, उमेश ठाकरे, अनिल गावंडे, यशवंत कांबे, दादाराव निशाने, श्रीकृष्ण वाकोडे, अतुल कुलट, नंदूभाऊ दिवनाले, कमलाकर गावंडे, सचिन खोकले, विष्णू लोडम, पंकज सरोदे, प्रवीण डुकरे, दिगंबर सदार, सुनील सोनोने, उल्हास मानकर, नारायण गावंडे, बाळासाहेब घोरमोडे, भीमराव गुल्हाने, गिरीधर मानकर आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक विष्णू लोडम यांनी केले, तर आभार संजय पखाले यांनी मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!