news
‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!‘महापालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे’; महापौर रवि लांडगे यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा!‘रंगमंचाच्या माध्यमातून कलेची नाळ जपली जाते, महापालिकेची साथ कौतुकास्पद’; समर नखाते यांचे मनोगत!‘न्यायालयीन परिसरातील गोळीबाराच्या प्रयत्नाने पुण्यात खळबळ; घटनास्थळावरून दोन पिस्तुले व मॅगझिन जप्त’!‘संविधानाचा करू सन्मान, पिंपरी-चिंचवड शहर माझा अभिमान’; महापालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे भव्य दौडीचे आयोजन!
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकांचे प्रसंगावधान आणि पोलिसांना केलेले सहकार्य समाजसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे’; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सामाजिक बांधिलकीचे कौतुक!

‘नागरिकांचे प्रसंगावधान आणि पोलिसांना केलेले सहकार्य समाजसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे’; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सामाजिक बांधिलकीचे कौतुक!

विसावा, दापोडी परिसरात एकटी आढळली होती चिमुकली; लहान मुले संशयास्पद स्थितीत आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडीतून अपहरण झालेल्या ६ वर्षीय बालिकेचा दापोडीत शोध; प्रसंगावधान दाखवून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या दोन नागरिकांचा डीसीपी संदिप आटोळे यांच्या हस्ते सत्कार!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या ६ वर्षीय बालिकेचा दापोडी परिसरात सुखरूप शोध लागला आहे. केवळ कन्नड भाषा येणाऱ्या या चिमुकलीला एकटे खेळताना पाहून प्रसंगावधान राखत तिला सुरक्षितपणे दापोडी पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या दोन सतर्क नागरिकांचा पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१) संदिप आटोळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३७ (२) अन्वये ६ वर्षीय बालिका कु. सौजन्या चलवत्रा पुजारी हिचे अपहरण झाल्याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून तिचा कसून शोध सुरू असताना दापोडी परिसरात पुढीलप्रमाणे घटना घडली.  दापोडी येथील अनिल शिवाजी काची (व्यवसाय – इलेक्ट्रिकल शॉप, रा. १८३, काची चाळ, दापोडी, पुणे) आणि अजय गोरख कांबळे (वय ४० वर्षे, व्यवसाय – चालक, रा. दापोडी) यांना ही बालिका विसावा, दापोडी परिसरात खेळताना आढळून आली. त्यांनी बालिकेकडे तिच्या घराबाबत व पालकांबाबत विचारपूस केली असता, तिला केवळ कन्नड भाषा येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या दोन्ही नागरिकांनी तात्काळ बालिकेला सुरक्षितपणे दापोडी पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अनिल शिवाजी काची आणि अजय गोरख कांबळे यांनी दाखविलेली सतर्कता व सामाजिक बांधिलकीच्या भावनेमुळे हरवलेल्या बालिकेला सुरक्षितपणे पोलिसांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत झाली. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१) संदिप आटोळे यांच्या हस्ते दापोडी पोलीस स्टेशन येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारे कोणीही लहान बालक संशयास्पद स्थितीत किंवा एकटे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. नागरिकांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि पोलिसांना केलेले सहकार्य हे समाजातील सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!