‘संविधान सन्मान दौड’निमित्त गुरुवारी पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत प्रमुख मार्ग बंद!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रथमच गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान दौड’ आयोजित करण्यात आली आहे. ‘संविधानाचा करू सन्मान, पिंपरी-चिंचवड शहर माझा अभिमान’ हा संदेश देणाऱ्या या दौडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत शहरातील काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळी ७.०० वाजता, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील भीमसृष्टी येथे दौडीचा समारोप होईल.
दौड सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी तसेच सहभागी नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत खालीलप्रमाणे वाहतूक बदल लागू राहतील:
नागरिकांनी गुरुवारी सकाळच्या सत्रात घराबाहेर पडताना या वाहतूक बदलांची नोंद घ्यावी आणि सुचवलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा. तसेच, संविधान सन्मान दौड यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
