पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांत ७ गुन्हे दाखल; अपघात, हाणामारी, घरघुसी व चोरीच्या घटनांचा समावेश!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्रौ ००.०० वाजेपासून २४.०० वाजेपर्यंत विविध पोलीस ठाण्यांत ७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये जीवघेणा रस्ता अपघात, मारहाण व धमकी, घरात घुसून हल्ला तसेच वाहन व साहित्य चोरीच्या घटनांचा समावेश आहे.
१. आळंदी: पेट्रोल पंपावर कॅब चालकास बेदम मारहाण; सोन्याची बाळी गहाळ
आळंदी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), ३५२, ३५१(२), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आळंदी शहरातील मरकळ रोडवरील घुंडरे पेट्रोल पंप (ता. खेड, जि. पुणे) येथे फिर्यादी भगवान विनायक आंधळे (वय ३१, धंदा-ड्रायव्हर, रा. कृष्णा आयकॉन विंग ए-१, फ्लॅट नं. ६०५, आळंदी; मूळ रा. माळेगाव चकला, ता. शिरूर कासार, जि. बीड) हे गाडीत सीएनजी भरून प्रवासी ट्रिपची वाट पाहत होते. आरोपी क्रमांक २) करण दत्ताराव इगे (वय २३, रा. चावडी चौक, आळंदी) याने गाडी काढण्यावरून वाद घालत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यानंतर आरोपी १) विजय संजय लहाने (वय २०, रा. ४ नं. शाळेजवळ, दत्त मंदिरामागे, आळंदी), ३) मोन्या उर्फ जय बाबाजी ठुबे (वय २०, रा. चोरचे वस्ती, वडगाव रोड, आळंदी) आणि ४) दोन अज्ञात इसम यांनी स्विफ्ट डिझायर कार (नं. MH-14-NE-7130) मधून उतरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी विजय लहाने याने कंबरेचा पट्टा काढून लोखंडी बकलने डोक्यात मारून जखमी केले व पुन्हा गाडी घेऊन दिसल्यास सोडणार नाही अशी धमकी दिली. मारहाणीत फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी गहाळ झाली. पुढील तपास पोउपनि बुधमल करीत आहेत.
बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), शस्त्र अधिनियम कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१)(३) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास सुसगाव (ता. मुळशी, जि. पुणे) येथील शितळादेवी मंदिराजवळ रेश्मा लोंढे यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारे फिर्यादी दीपक गोपीचंद पानपाटील (वय २१, मूळ रा. भामेर, ता. साक्री, जि. धुळे) यांच्या घरी आरोपी १) सुरज सर्जेराव पंडित (रा. काळुबाई मंदिराजवळ, सुसगाव), २) राज दातीर, ३) माऊली काळभोर (दोघे रा. रावेत, पुणे), ४) आदित्य सोनावणे आणि ५) राहुल टकाळे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गाडीतून दोन लोखंडी कोयते घेऊन प्रवेश केला. त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिली तसेच अंगावर धावून आले. पुढील तपास पोउपनि सुरासे करीत आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे किराणा व दूध घेण्यासाठी गेलेले फिर्यादी संभाजी तात्याबा राऊत (वय ६०, धंदा-मजुरी, रा. फ्लॅट नं. ८०५, हॅपी सिटी, ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे) यांना कॅरीबॅग मागितल्याच्या कारणावरून आरोपी राहुल विराजदार (रा. तळेगाव दाभाडे) याने शिवीगाळ व हाताने मारहाण केली. सामान घेऊन जात असताना आरोपीने पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी फिर्यादीच्या अंगावर घालून उजव्या पायाला गंभीर दुखापत केली व जमिनीवरील दगड उचलून मारहाण केली. फिर्यादीचा मुलगा रामलिंग याने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. आरोपी चारचाकी गाडी घेऊन पसार झाला. पुढील तपास पोउपनि बेडगे करीत आहेत.
बावधन पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६(१), १२५(अ), ३२४(४) आणि मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-सातारा रोडवरील आपुलकी हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलावर (बाणेर, पुणे) टाटा कंपनीच्या ट्रक (नं. MH-11-CH-5707) चा चालक दादा पांडुरंग गायकवाड (वय ४९, रा. आतित, ता. जि. सातारा) याने निष्काळजी व भरधाव वेगात ट्रक चालवून फिर्यादी वरद विनोद पाटील (वय १८, धंदा-शिक्षण, रा. योगी बॉईज हॉस्टेल, गुरुवार चौक, आकुर्डी, पुणे; मूळ रा. लाटवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या ॲक्टिव्हा मोटारसायकलला (नं. MH-11-CR-5430) पाठीमागून धडक दिली. या अपघातात वरद पाटील किरकोळ जखमी झाले, तर त्यांचा मित्र स्वयंम सागर येवले (वय १८) गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. मोटारसायकलचेही नुकसान झाले. पुढील तपास पोउपनि ठाकरे करीत आहेत.
भोसरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(बी) आणि मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास चंद्रमणी हौसिंग सोसायटी, आदर्शनगर, दिघी रोड, भोसरी, पुणे येथे फिर्यादी यांचा मुलगा अंशकुमार दाभाडे (वय २.५ वर्षे) सोसायटीत खेळत असताना मोटारसायकल (नं. MH-14-JK-0750) चालक आकाश मधुकर कांबळे (वय १९) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून चिमुकल्याच्या डाव्या पायाच्या मांडीस धडक देऊन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दि. २४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहवा/माने करीत आहेत.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३८/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.०० ते दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० दरम्यान समर्थ कॉलनी, निर्मल बेथनी इंग्लिश स्कूलजवळ, विजयनगर, काळेवाडी, पुणे येथील कन्स्ट्रक्शन साईटवरून अज्ञात चोरट्याने ४०,००० रुपये किमतीच्या एकूण ३० नग लोखंडी सेंट्रींग प्लेट्स चोरून नेल्या. याबाबत कॉन्ट्रॅक्टर नाझीम हकिम अन्सारी (वय ३७, रा. अन्सारी मंझिल, शिवकृपा कॉलनी, बागदेव नगर, किवळे, देहूरोड, पुणे; मूळ रा. लंडवा, पोस्ट सडकी, जि. हजारीबाग, झारखंड) यांनी फिर्याद दिली असून तपास सपोनि नलावडे करीत आहेत.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३९/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.०० ते दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० दरम्यान विजयनगर बसस्टॉप, काळेवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केलेली १,५०,००० रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची तीनचाकी ऑटो रिक्षा (नं. MH-14-HM-7727) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी रिक्षाचालक राकेश विठ्ठल टोणपे (वय ३५, रा. मोरया कॉलनी, विजयनगर, काळेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि नलावडे करीत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
