news
‘पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन’; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती!‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!‘महापालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे’; महापौर रवि लांडगे यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा!‘रंगमंचाच्या माध्यमातून कलेची नाळ जपली जाते, महापालिकेची साथ कौतुकास्पद’; समर नखाते यांचे मनोगत!‘न्यायालयीन परिसरातील गोळीबाराच्या प्रयत्नाने पुण्यात खळबळ; घटनास्थळावरून दोन पिस्तुले व मॅगझिन जप्त’!
Home पिंपरी चिंचवड ‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर व शहर अभियंता मनोज सेठिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि विविध नागरी समस्यांवर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. अतिक्रमण कारवाई अधिक परिणामकारक करण्यासाठी संबंधित ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) अतिक्रमणविषयक आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.

शहरातील पदपथ आणि अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांनी पुढीलप्रमाणे कडक सूचना दिल्या.  शहरातील अनधिकृत दुकाने आणि बांधकामे हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. पादचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता यावे, यासाठी फुटपाथची सलग जोडणी (फुटपाथ कनेक्टिव्हिटी) कायम ठेवावी. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून आवश्यकतेनुसार पाडकाम करावे. तसेच, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत शहरातील स्वच्छता, पावसाळी निचरा आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवावा. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांवर केलेले अनधिकृत कल्व्हर्ट त्यांनीच हटवावेत, तर सोसायट्यांनी उभारलेल्या कल्व्हर्टची जबाबदारी संबंधित सोसायटीने घ्यावी. पावसाचे पाणी अडवले जाणार नाही किंवा त्याचा प्रवाह वळून नागरिकांच्या मालमत्तांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू न देता नागरिकांना परिसर स्वच्छ दिसेल अशी दृश्यमान स्वच्छता (व्हिजिबल क्लीनलिनेस) राखावी. तसेच बीआरटी मार्गालगतच्या महापालिकेच्या पार्किंग सुविधांचा योग्य वापर सुनिश्चित करणे आणि महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील गळतीच्या समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटच्या नियोजनाबाबतही सविस्तर चर्चा झाली. शहरातील ६५ आरएमसी साइट्सनी निर्धारित नियम व निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या प्लांटसाठी स्वतंत्र झोन व योग्य जागा निश्चित करण्याचे नियोजन करावे, तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिताराम बहुरे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, तसेच क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!