news
‘पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन’; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती!‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!‘महापालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे’; महापौर रवि लांडगे यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा!‘रंगमंचाच्या माध्यमातून कलेची नाळ जपली जाते, महापालिकेची साथ कौतुकास्पद’; समर नखाते यांचे मनोगत!‘न्यायालयीन परिसरातील गोळीबाराच्या प्रयत्नाने पुण्यात खळबळ; घटनास्थळावरून दोन पिस्तुले व मॅगझिन जप्त’!
Home पिंपरी चिंचवड ‘पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन’; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती!

‘पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन’; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, योगेश बहल, जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आदरांजली | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते” — महापौर रवि लांडगे!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे उपपंतप्रधान यांसह केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली असून, ते राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते होते, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रमुख ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकारामनगर वायसीएम रुग्णालयातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर येथील त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, नगरसदस्या वर्षा जगताप, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मेट्रन वत्सला वाजे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष महादेव बोत्रे, विजय मुंडे, सविता निगडे, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!