news
पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षणाचा बिगुल; मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक!भिवंडीत फास्ट फूडमुळे १२२ जणांना तीव्र अन्नविषबाधा; मनपाने हॉटेलचे अनधिकृत बांधकाम बुलडोझरने केले जमीनदोस्त!पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा महिला मोर्चाचा ‘इंधन आणि खाद्यतेल बचत’ उपक्रम; गृहिणींना दिले निरोगी जीवनशैलीचे धडे!पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाचा ‘योगोत्सव’ शहरभर यशस्वी! १५ मंडलांच्या अध्यक्षांच्या धडाकेबाज पुढाकाराने हजारो महिलांचा सहभागपिंपळे गुरवच्या जिजाऊ सृष्टीत घुमला ‘समत्वं योग उच्यते’चा महामंत्र! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नागरिकांची अथांग गर्दी
Home पिंपरी चिंचवड ‘देशासाठी समर्पित सेवा’: पिंपरी-चिंचवडमध्ये मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर ‘मंथन’!

‘देशासाठी समर्पित सेवा’: पिंपरी-चिंचवडमध्ये मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर ‘मंथन’!

प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनात 'विकसित भारता'च्या धोरणांवर सखोल चर्चा; भाजप शहराध्यक्ष बापू काटेंकडून आयोजन. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढली: प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन!

 

 

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बुद्धिजीवी संमेलन’ उत्साहात संपन्न; ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत ‘विकसित भारता’वर सखोल चर्चा!

 

पिंपरी-चिंचवड, दि. २९ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ प्रगतीच केली नाही, तर जागतिक पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान म्हणजे या ११ वर्षांच्या अतुलनीय वाटचालीचा गौरव आहे.” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर भाजपने आयोजित केलेल्या ‘बुद्धिजीवी संमेलना’त केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळावर प्रकाश टाकतांना ते बोलत होते.


 

अर्थव्यवस्था ते डिजिटल इंडिया: ‘मोदी सरकार’ची अकरा वर्षांची यशोगाथा!

 

जावडेकर पुढे म्हणाले की, “आज भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडत आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक स्तरावर काम केले आहे.” ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे केवळ एक घोषवाक्य नसून, ते मोदी सरकारच्या कारभाराचे आणि भारताच्या विकासाचे मूलभूत तत्त्व आहे. पुढील काळातही देशाची ही विकासाची घोडदौड अशीच वेगाने सुरू राहील आणि भारत एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.


 

‘बुद्धिजीवी संमेलन’: कासारवाडीत विचारमंथन!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय समितीने सुरू केलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वात ‘बुद्धिजीवी संमेलन’ शनिवारी, सायंकाळी हॉटेल कलासागर, कासारवाडी, येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भारताच्या विकासाची वाटचाल आणि पुढील दिशा यावर विचारमंथन करण्यासाठी आयोजित या संमेलनाला विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली मते व्यक्त केली.

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि आमदार तथा बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिजीवी संमेलनाचे संयोजक ऍड. गोरखनाथ झोळ, सहसंयोजक सीए बबन डांगले, दीपक भंडारी, चैतन्य पाटील, अमेय देशपांडेडॉ. प्रताप सोमवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.


 

कार्यक्रमाला मान्यवर आणि कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती!

 

यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर राहुल जाधव, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस संजय मंगोडेकर, विजय उर्फ शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, शहर प्रवक्ते राजू दुर्गे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, सुभाष चिंचवडे, यशवंत भोसले, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, माधवी राजापुरे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली खाडे, भारती विनोदे, मंडल अध्यक्ष मोहन राऊत, ऍड.हर्षद नढे, सनी बारणे, गणेश ढोरे, सोमनाथ तापकीर, ऍड. योगेश सोनवणे, अमोल डोळस, शिवराज लांडगे, अजित बुर्डे, रामदास कुटे, धरम वाघमारे, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, अनिता वाळूंजकर, काळुराम बारणे, विजय फुगे, संजय पटनी, हनुमंत लांडगे, ऍड. सय्यद सिकंदर, माणिकराव अहिरराव, अजित कुलथे, रवी देशपांडे, जवाहर ढोरे, महादेव कवितके, संतोष तापकीर, कैलास कुटे, विशाल वाळुंजकर, सचिन तापकीर, चेतन बेंद्रे, सागर फुगे, कैलास सानप, गणेश ढाकणे, सचिन राऊत, हरीश मोरे, प्रकाश लोहार, राकेश नायर, संजय कणसे, कविता हिंगे, दीपाली धनोकार, तेजस्विनी दुर्गे, राजश्री जायभाय, आशा काळे, पल्लवी पाठक, गीता महेंद्रू, नंदू भोगले, पोपट हजारे, भूषण जोशी यांच्यासह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोदी सरकारने बजावलेली भूमिका यावर मान्यवरांनी विचारमंथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संजय मंगोडेकर यांनी मांडले. सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले तर आभार राजेश पिल्ले यांनी मानले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!