news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home पिंपरी चिंचवड नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे धाव

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे धाव

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढा; 'कुत्रा पकडण्याची मोहीम' वाढवण्याची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस! महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची महापालिकेकडे धाव

 


 

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर; पक्षाचे शहर अध्यक्ष विजय जरे यांनी दिली ‘कुत्रा पकडण्याची मोहीम’ वाढवण्याची मागणी.

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, २७ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरेवस्ती आणि म्हेत्रेवस्ती परिसरातील नागरिकांना सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या केवळ त्रसाची राहिली नसून, आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनली आहे. रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर हल्ल्याचा धोका वाढला असून, आरोग्यविषयक अडचणीही वाढत आहेत.

या गंभीर समस्येवर महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी यासाठी, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहर अध्यक्ष विजय जरे यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांना निवेदन दिले. या निवेदन प्रसंगी समाजिक कार्यकर्ते सचिन शिंदेकिशोर भंडारी उपस्थित होते.

 

 

महापालिकेकडे चार कडक मागण्या

 

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने नागरिकांच्या वतीने महापालिकेकडे तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. निवेदनामध्ये खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे:

  1. संख्या नियंत्रण: भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या त्वरित कमी करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी.
  2. हलगर्जीपणावर नियंत्रण: कुत्रा पकडण्याच्या गाड्यांच्या (Dog Catching Vans) कामात होणारा हलगर्जीपणा महापालिकेने थांबवावा.
  3. मोहीम नियमित करा: परिसरातील प्रभागात आठवड्यातून किमान 3 वेळा कुत्रा पकडण्याची गाडी नियमितपणे यावी.
  4. सुरक्षित वातावरण: परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी तात्काळ उपाययोजना करावी.

ही समस्या केवळ एका परिसराची नाही, तर संपूर्ण शहराच्या सार्वजनिक सुरक्षिततेचा भाग आहे. नागरिकांनी व्यक्त केलेल्या या तीव्र मागणीवर महापालिका प्रशासन तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!