news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home मुख्यपृष्ठ राहुल गांधींना थेट जीवे मारण्याची धमकी! सोलापूर काँग्रेसचा संतापाचा उद्रेक; भाजपविरोधात भव्य आंदोलन

राहुल गांधींना थेट जीवे मारण्याची धमकी! सोलापूर काँग्रेसचा संतापाचा उद्रेक; भाजपविरोधात भव्य आंदोलन

"संविधानावर थेट आघात"; महागाई-बेरोजगारीचे प्रश्न मांडल्याने भाजपकडून धमक्यांचा मार्ग - शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांचा गंभीर आरोप. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

“गोडसेची औलाद विचारांची लढाई लढू शकत नाही!” राहुल गांधींना धमकी दिल्याबद्दल सोलापूर काँग्रेसचे तीव्र आंदोलन

 


 

‘छातीत गोळी झाडण्याची’ धमकी थंड, नियोजनबद्ध कटकारस्थान; भाजप प्रवक्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी.

 

सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी ,३० सप्टेंबर २०२५ , मॅक्स मंथन डेली न्यूज:

लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांना लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी ‘छातीत गोळी झाडली जाईल’ अशी थेट जीवे मारण्याची भीषण धमकी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे जोरदार निदर्शने आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

हे आंदोलन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

“मोदी सुन ले, हम नहीं डरेंगे!” – काँग्रेसच्या घोषणा

 

आंदोलनकर्त्यांनी यावेळी “राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपचा निषेध असो,” “राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,” आणि “मोदी सुन ले हम नहीं डरेंगे, संघी दंगी होश में आओ” अशा घोषणा देऊन भाजपविरोधात आपला संताप व्यक्त केला.

या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मा. अभिजीत पाटील व तहसीलदार मा. दिनेश पारघे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“हा विचारशून्यतेचा पुरावा आहे” – चेतनभाऊ नरोटे

 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “राहुलजी गांधी यांना गोळ्या घालण्याचे हे विधान निष्काळजीपणाने किंवा भाषेचे घसरलेले वाक्य नसून थंड, नियोजनबद्ध व अंगावर काटा आणणारे आहे. या धमकीमुळे केवळ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेलाच धोका नाही, तर आपल्या संविधान, कायद्याचे राज्य आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात झाला आहे.”

नरोटे पुढे म्हणाले की, “ज्यांचा आदर्शच दहशतवादी गोडसे आहे, ते विचारांची लढाई लढू शकत नाहीत. म्हणूनच विरोधकांना ठार मारण्याच्या कुरापती रचल्या जात आहेत. विचारांची लढाई लढू न शकणारी ही गोडसेची औलाद राहुल गांधींना गोळी घालण्याची धमकी देत आहे.”

राहुल गांधींच्या कुटुंबियांनी (स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी) देशासाठी बलिदान दिले आहे, याची आठवण करून देत, राहुल गांधींना दिलेली धमकी ही लोकशाहीच्या आत्म्यावर थेट हल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी हे कोट्यवधी जनतेचा आवाज बनून महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न मांडत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळेच त्यांनी राजकीय प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याच्या धमक्यांचा मार्ग अवलंबला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कॉंग्रेस पक्षाने भाजप प्रवक्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे, अन्यथा काँग्रेस पक्ष मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, मा. नगरसेवक विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, परवीन इनामदार, हारून शेख, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस शकील मौलवीश्रीशैल रणधीरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, युवक मध्य अध्यक्ष वाहिद बिजापूरे, युवक उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, अब्दुल खलीक मुल्ला, अनुसूचित जाती अध्यक्ष मयूर खरात, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अंबादास गुत्तीकोंडा, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, शोहेब महागामी, लखन गायकवाड, परशुराम सातारेवाले, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, करिमुनिसा बागवान, भीमराव शिंदे, तोशिफ शेख, रुस्तुम कंपली, नूर अहमद नालवार, कुणाल गायकवाड, विवेक कन्ना, सुनील सारंगी रजाक कादरी, बाबू विटे, राजन परदेशी, सुदर्शन अवताडे, महेंद्र शिंदे, आशुतोष वाले, शिवाजी साळुंखे, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रुकैयाबानू बिराजदार, छाया हिरवटे, आदित्य म्हमाणे, व्यंकटेश बोम्मेन, अभिषेक गायकवाड, श्रीनिवास परकीपंडला, नागनाथ शावणे, अयान नाडेवाले, रियाज नाईकवाडी, अजीम शेख, मेघा बनसोडे, मारता रावडे, अलिमा शेख, विजय बालनकर, महीबुब शेख यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!