शिक्षक आमदारकीसाठी तयारी! अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
पात्र शिक्षकांनी तातडीने ‘नमुना ‘ (Form ) अर्ज दाखल करावेत; जुन्या मतदारांनाही नव्याने नोंदणी आवश्यक – जिल्हाधिकारी वर्षा मीना.
अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, दि. सप्टेंबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्या मतदार याद्या नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमुना- (Form ) मधील अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रांसह तातडीने दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी मीना यांनी आज पत्रकार परिषदेत पुनरीक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक आणि नियमावलीची माहिती दिली. विभागीय आयुक्त अमरावती हे या मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी असून, जिल्हाधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहतील.

मतदार पात्रतेचे निकष काय आहेत?
शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- व्यक्ती भारतीय नागरिक असावी आणि त्या मतदारसंघातील रहिवासी असावी.
- नोव्हेंबर च्या लगत पूर्वीच्या वर्षांमध्ये किमान वर्षे पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे.
- संबंधित शैक्षणिक संस्था माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जाची नसावी.
विशेष सूचना: ज्या व्यक्तींची नावे विद्यमान मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, त्यांनी देखील नव्याने नमुना- भरून आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे (वेळापत्रक)
पात्र शिक्षकांनी खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे:
अर्ज कोठे सादर करावा?
पात्र शिक्षकांना नमुना- मधील अर्ज नोव्हेंबर पर्यंत सादर करता येईल.
- पदनिर्देशित अधिकारी कार्यालये: जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि सर्व तालुक्यांचे तहसीलदार कार्यालय.
- ऑनलाईन उपलब्धता: अर्ज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Graduates-and-Teachers-Constituencies-2025.aspx) आणि अकोला जिल्हा प्रशासनाच्या (https://akola.gov.in/) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
एकगठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत!
मतदार नोंदणीसाठी एकगठ्ठा अर्ज, मग ते वैयक्तिक असोत किंवा पोस्टाने पाठवलेले असोत, विचारात घेतले जाणार नाहीत. तथापि, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख त्यांच्या संस्थेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितपणे सादर करू शकतात. राजकीय पक्ष, प्रतिनिधी किंवा वेल्फेअर असोसिएशन यांना एकगठ्ठा अर्ज करता येणार नाही.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व पात्र शिक्षकांना या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
