news
Home पिंपरी चिंचवड भोईरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना आता अद्ययावत शिक्षण! मुळशीत ‘सेवा पंधरवड्या’अंतर्गत संगणक कक्षाचे फर्निचर भेट

भोईरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना आता अद्ययावत शिक्षण! मुळशीत ‘सेवा पंधरवड्या’अंतर्गत संगणक कक्षाचे फर्निचर भेट

मुळशी तालुका सभापती पांडाभाऊ ओझरकर यांच्या हस्ते उद्घाटन; पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ७५ वृक्षांचेही रोपण. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सेवा पंधरवड्यात ‘अमृत वृक्षारोपण’: मुळशीतील भोईरवाडी शाळेत रोपे आणि संगणक कक्षासाठी फर्निचर भेट

 


 

पंतप्रधान मोदींच्या व्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम; शारदा सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने शाळा झाली सुसज्ज.

 

मुळशी, पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले,दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

राष्ट्रसेवक पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत मुळशी तालुक्यातील माण भोईरवाडी जिल्हा परिषद शाळेत विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वृक्षारोपण आणि शाळेसाठी आवश्यक संगणक कक्षाच्या फर्निचरचे उद्घाटन करण्यात आले.

 

वृक्षांचे रोपण आणि खाऊ वाटप

 

‘सेवा पंधरवड्या’चे औचित्य साधून भोईवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष हनुमंत आप्पा चव्हाण, संदीपभाऊ साठे युवाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, मुळशी तालुका पूर्व यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित होते .

 

संगणक कक्षाला फर्निचरची भेट

 

या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शाळेतील संगणक कक्षाला मिळालेली मदत. शारदा सोशल फाउंडेशनतर्फे युवा नेते तथा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेशशेठ भोईर यांच्या वतीने संगणक कक्षासाठी फर्निचर व खुर्च्या भेट देण्यात आल्या.या फर्निचरचे उद्घाटन मुळशी तालुका सभापती मा. पांडाभाऊ ओझरकर व भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष हनुमंत आप्पा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता अद्ययावत संगणक कक्षात बसून शिक्षण घेता येणार आहे.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष हनुमंत आप्पा चव्हाण, शिवाजीराव बुचडे पाटील, गंगाराम मातेरे, सुरेश भाऊ हुलावळे, उपसरपंच शशिकांत धुमाळ, गुलाब भाऊ लेणे, पंडितआण्णा गवारे, तसेच आयोजक संदीप भाऊ साठे युवाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, मुळशी तालुका पूर्व यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे शिक्षक निकम सर, झुलुक सर, शेजवळ मॅडम आणि इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

आयोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!