मदत नव्हे, साथ! अतिवृष्टीग्रस्तांना धीर देत खासदार प्रणिती शिंदे यांची ‘माणुसकीची’ भेट
पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले; अन्नधान्य, कपड्यांसह जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करत हजारो कुटुंबांना दिलासा.
सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
अतिवृष्टीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधवांचे हातातले पीक, घरातील संसार आणि जनावरांचे छत्र क्षणात वाहून गेले आहे. आयुष्यभराच्या कष्टाचे स्वप्न पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत.
अशा गंभीर प्रसंगी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांना धीर दिला आहे. त्यांनी केवळ नेतृत्वच नव्हे, तर काळजीही या भावनेतून पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सामाजिक जबाबदारी म्हणून मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
या वाटपामध्ये अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, चादरी आणि कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचा समावेश आहे. या तत्काळ मदतीमुळे हजारो पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या काळात मदतीपेक्षा ‘साथ’ महत्त्वाची असते, हेच खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
