मोठी कामगिरी! पिंजर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड; हजारांचा मुद्देमाल जप्त, एका आरोपीस अटक
मूर्तीजापूरच्या आरोपीकडून सोन्याचे दागिने, चांदीचा करंडा आणि चोरीची मोटरसायकल हस्तगत; पोलीस अधिकारी अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
अकोला/पिंजर, प्रतिनिधी : विलास सावळे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंजर पोलीस स्टेशनने घरफोडीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास पूर्ण करून आरोपीला अटक केली आहे, तसेच त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये आहे.
काय आहे नेमका प्रकार?
तक्रारदार अनुराधा अनिल महल्ले (रा. दुधलम) यांनी दिनांक च्या रात्री त्यांचे घर बंद करून त्या शेजारच्या जेठानी यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या. सकाळी घरी परत आल्यावर त्यांना स्वयंपाक खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. घरात लोखंडी कपाटातील सोने, चांदीचे दागिने आणि नगदी रुपये, असा एकूण रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पिंजर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हेगाराला मुर्तीजापूरमधून अटक
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मॅडम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकाने तपास करून आरोपी नामे सुनील श्रीकृष्ण काकड (वय , रा. दाताळा, ता. मुर्तीजापुर) यास दिनांक रोजी अटक केली.
जप्त केलेला मुद्देमाल (किंमत रुपये)
आरोपी सुनील काकड याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमालासह एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात खालील वस्तूंचा समावेश आहे:
- ग्रॅम सोन्याची पोत
- ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप
- चांदीचा करंडा व देव
- मोबाईल (गुन्ह्यात वापरलेले)
- चोरीची मोटरसायकल (क्रमांक MP ZC – पोस्टे माहली, जि. अमरावती ग्रामीण येथील चोरीची).
सदरची यशस्वी कारवाई पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या नेतृत्वाखाली ASI चव्हाण, HC नागसेन वानखडे, HC चंद्रशेखर गोरे, PC वैभव मोरे, Hg नजीर हुसेन, Hg अय्याज खान आणि Hg शरद पवार यांनी केली.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
