ऐतिहासिक क्षण! राज्यात एकाचवेळी हजारहून अधिक उमेदवारांना नोकरी
अकोला जिल्ह्यात उमेदवारांना अनुकंपा आणि लिपिक भरतीचे नियुक्तीपत्र; आमदार रणधीर सावरकर आणि अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया.
अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
राज्य सरकारने एकाचवेळी हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन मोठा ऐतिहासिक क्षण साधला. अनुकंपा तत्त्वावरील आणि लिपिक भरतीतील यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम अकोला येथील नियोजनभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

जिल्ह्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र
राज्यातील या भव्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अकोला येथील नियोजनभवनात करण्यात आले. अकोला जिल्ह्यात एकूण उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले:
नियुक्तीपत्र मिळालेल्या अनुकंपा उमेदवारांमध्ये राज्य शासनाचे , ग्रामविकास विभागातील , नगरविकास विभागातील आणि गृह विभागातील उमेदवारांचा समावेश आहे.

राज्यात उमेदवारांना लाभ
यावेळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. राज्यात आज एकूण उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात आले, ज्यात अनुकंपा आणि एमपीएससी उमेदवारांचा समावेश आहे.
प्रशासनाने ही प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’ वर पार पाडली. आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, शासनाने विशेष मोहीम आखून अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे. तर, आमदार अमोल मिटकरी यांनी एकाचवेळी उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा हा क्षण ऐतिहासिक असल्याचे नमूद केले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया ‘मिशन मोड’ वर राबविण्यात आल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला खासदार अनूप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलिस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपवन संरक्षक सुमंत सोळंके, अति. जिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
