वर्षांची यशस्वी वाटचाल: ‘लीला पूनावाला फाउंडेशन एक वटवृक्ष’ – डॉ. किरण बेदी
माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांची गौरवपर प्रशंसा; संस्थेचा वा शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात पार पडला; पर्यंत मुलींना सक्षम करण्याचे ध्येय.
पुणे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लीला पूनावाला फाउंडेशनने (LPF) आपल्या कार्याचा वर्षांचा अभिमानास्पद टप्पा यशस्वीरीत्या गाठला आहे. या निमित्ताने संस्थेचा वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळा पुणे येथील देवांग मेहता ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

डॉ. किरण बेदींची ऐतिहासिक उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती. विशेष म्हणजे, त्या मध्ये एलपीएफच्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या होत्या. तब्बल वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा याच मंचावर येऊन इतिहासाची पुनरावृत्ती केली.
डॉ. बेदी यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले, “लीला पूनावाला फाउंडेशन एक वटवृक्ष झाला असून हजारो युवतींना बळ देत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. मध्ये मी येथे आले तेव्हा फक्त मुली होत्या आणि आज हे कुटुंब पेक्षा अधिक आहे. ही तुमच्या ‘लीला गर्ल्स’ची शक्ती आहे. आता या चळवळीला पुढील अनेक वर्षे चालविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.”

स्मरणिका प्रकाशन आणि भविष्यातील ध्येय
- स्मरणिका प्रकाशन: डॉ. बेदी यांच्या हस्ते एलपीएफच्या वर्षांच्या कार्यप्रवासावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
- प्रतीकात्मक भेट: संस्थेचे संस्थापक फिरोज पुनावाला यांनी डॉ. बेदी यांना एक भिंतीवरील घड्याळ भेट दिले आणि म्हणाले, “हे घड्याळ सतत चालणाऱ्या आणि वाढणाऱ्या लीला पूनावाला फाउंडेशनचे प्रतीक आहे.”
संस्थापिका सुश्री लीला पुनावाला यांनी आपल्या भाषणात सांगितले, “आमचे ध्येय केवळ शिष्यवृत्तीपुरते मर्यादित नाही. आम्ही आत्मविश्वासी, सक्षम आणि संवेदनशील महिला नेत्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
या कार्यक्रमाला संस्थापक विश्वस्त फे्रनी तारापोरे, शेर्नाझ एडीबम, माया ठदानी आणि फिरोज पुनावाला उपस्थित होते. च्या पहिल्या बॅचमधील अनेक विद्यार्थिनींनीही या सोहळ्याला हजेरी लावत आपल्या भावना व्यक्त केल्या.
लीला पूनावाला फाउंडेशनने गेल्या तीन दशकांत आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार पुणे शहरासोबत वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे केला आहे. संस्थेने पदव्युत्तर आणि पदवी शिष्यवृत्तीबरोबरच शालेय मुलींसाठी ‘’ हा विशेष कार्यक्रमही सुरू केला आहे.
वर्षांच्या या यशस्वी प्रवासानंतर, फाउंडेशनने पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मुलींचे जीवन सकारात्मकपणे बदलण्याचे ध्येय ठेवले आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
