news
पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षणाचा बिगुल; मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक!भिवंडीत फास्ट फूडमुळे १२२ जणांना तीव्र अन्नविषबाधा; मनपाने हॉटेलचे अनधिकृत बांधकाम बुलडोझरने केले जमीनदोस्त!पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा महिला मोर्चाचा ‘इंधन आणि खाद्यतेल बचत’ उपक्रम; गृहिणींना दिले निरोगी जीवनशैलीचे धडे!पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाचा ‘योगोत्सव’ शहरभर यशस्वी! १५ मंडलांच्या अध्यक्षांच्या धडाकेबाज पुढाकाराने हजारो महिलांचा सहभागपिंपळे गुरवच्या जिजाऊ सृष्टीत घुमला ‘समत्वं योग उच्यते’चा महामंत्र! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नागरिकांची अथांग गर्दी
Home अमरावती मराठी भाषा अजरामर! तंजावरमध्ये ४०० वर्षानंतरही मराठीचे अस्तित्व; अमरावतीत ११ अभिजात भाषांचा जागर

मराठी भाषा अजरामर! तंजावरमध्ये ४०० वर्षानंतरही मराठीचे अस्तित्व; अमरावतीत ११ अभिजात भाषांचा जागर

'मातृभाषेचा अभिमान' टिकवण्यासाठी लवकरच अनुवाद समितीची स्थापना; मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची परिषदेत महत्त्वाची घोषणा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘अभिजात मराठी भाषा परिषद’ देशासाठी महत्त्वपूर्ण: मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

 


 

अमरावती विद्यापीठात अभिजात भाषांचा संवाद; अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक – डॉ. सामंत

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे, आणि ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील अभिजात भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अमरावती येथील पहिली अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत राज्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित अभिजात मराठी भाषा परिषदेच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर आणि मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

परिषदेतून भाषांना नवी दिशा

 

डॉ. सामंत म्हणाले की, या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. त्यांच्या ज्ञानामुळे अभिजात भाषांना नवी दिशा मिळणार आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिजात भाषांचा संवाद साधला जात आहे.

  • मातृभाषेचा अभिमान: अखंड भारतात विविध बोलीभाषा बोलल्या जातात आणि त्यांचे रूपांतर बोलीभाषेत होते. मातृभाषा ही अभिमानाची असून ती बोलता आली पाहिजे आणि त्यातून भावना कळल्या पाहिजेत.
  • मराठी अजरामर: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र स्थापन करून मराठी भाषा अजरामर झाली आहे.
  • अनुवाद समिती: येत्या काळात विविध भाषांमधील चांगले साहित्य मराठीत भाषांतरीत व्हावे, यासाठी लवकरच अनुवाद समिती स्थापन करण्यात येणार आहे.

तंजावरमध्ये वर्षानंतरही मराठीचे अस्तित्व

 

मंत्री डॉ. सामंत यांनी तंजावर (तमिळनाडू) येथील मराठीच्या अस्तित्वाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “तंजावर सारख्या भागात वर्षानंतरही मराठीचे अस्तित्व टिकून आहे, म्हणूनच मराठीला अग्रक्रम आहे.” तंजावर सारख्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन बांधण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, बांधकामासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.

अभिजात भाषांचे कार्य अखंडपणे पुढे नेण्यासाठी उत्कृष्ट नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!