news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home अमरावती ८ दिवसांत तात्पुरते प्रमाणपत्र, ३० दिवसांत उत्तरपत्रिकांची प्रत! शिक्षण मंडळाच्या ५ सेवा आता मोबाईलवर

८ दिवसांत तात्पुरते प्रमाणपत्र, ३० दिवसांत उत्तरपत्रिकांची प्रत! शिक्षण मंडळाच्या ५ सेवा आता मोबाईलवर

खासगी उमेदवारांना परीक्षेसाठी प्रविष्ट होण्याची मुभा ते गुण पडताळणी; आता राज्य मंडळाच्या सेवांसाठी विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शिक्षण मंडळाच्या सेवा आता ‘ऑनलाईन’: विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना!

 


 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सुविधा; द्वितीय गुणपत्रक ते उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी कालावधी निश्चित.

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाच सेवा आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध केल्या आहेत. या सेवांसाठी लागणारा कालावधी आणि संबंधित अधिकारी यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत सेवा मिळू शकतील.

 

ऑनलाईन अधिसूचित सेवा आणि कालावधी

 

मंडळाने जाहीर केलेल्या अधिसूचित सेवा आणि त्यांना लागणारा कालावधी खालीलप्रमाणे आहे:

सेवा लागणारा कालावधी
द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्र मिळविणे तात्काळ दिवस, नियमित दिवस
तात्पुरते (Provisional) प्रमाणपत्र मिळविणे अर्ज सादर केल्यापासून दिवसांच्या आत
निकालानंतर गुण पडताळणी अर्ज अर्ज सादर करण्याच्या दिवसांत प्राप्त होईल
उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत निकालानंतर अर्ज सादर करण्यापासून दिवस किंवा तत्पूर्वी
खाजगी उमेदवारांना परीक्षेसाठी प्रविष्ट होण्याची मुभा मंडळाच्या वार्षिक वेळापत्रकानुसार

 

सेवा संबंधित अधिकारी

 

या अधिसूचित सेवांशी संबंधित अधिकाऱ्यांची पदानुक्रम रचना निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे सेवा वेळेत न मिळाल्यास पुढील कार्यवाही करता येईल:

  • पदनिर्देशित अधिकारी: संबंधित विभागीय मंडळाचे विभागीय सचिव.
  • प्रथम अपीलीय अधिकारी: संबंधित मंडळाचे विभागीय अध्यक्ष.
  • द्वितीय अपीलीय अधिकारी: राज्य मंडळाचे अध्यक्ष.

सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी अधिक माहितीसाठी राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे राज्यमंडळाचे सहसचिव प्रमोद गोफने यांनी केले आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!