news
Home पुणे ‘पुन्हा इकडे कशाला आली? ही जागा आमची आहे!’ म्हणत शेतीत काम करणाऱ्या कुटुंबाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

‘पुन्हा इकडे कशाला आली? ही जागा आमची आहे!’ म्हणत शेतीत काम करणाऱ्या कुटुंबाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

मरकळ, खेड येथील दोन आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल; महिलेचा पदर ओढल्याने साडी फाटली, लहान मुलीलाही धमकावले. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शेतीत काम करत असताना महिलेला मारहाण! – जातीवाचक शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल

 


 

आरोपींकडून महिलेला लाकडाने मारहाण; SC/ST ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाईची मागणी

 

पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

खेड तालुक्यातील मरकळ परिसरात शेतीत काम करत असलेल्या एका 30 वर्षीय महिलेला दोन आरोपींनी मारहाण करून विनयभंग केला. तसेच, जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी खेड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता ११८(१),११७(२) सह अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा १९९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नेमका काय आहे प्रकार?

 

दिनांक १५/१०/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मरकळ, ता. खेड येथील गट क्र. ८०७ मधील शेतजमिनीत फिर्यादी महिला काम करत असताना ही घटना घडली.

  • आरोपी: १ तेजस राजाराम लोखंडे वय ३० आणि २  प्रसाद हनुमंत लोखंडे वय २८, दोघेही रा. बाजाले वस्ती, मरकळ, ता. खेड.
  • घडलेली घटना: आरोपी क्र. १ याने फिर्यादींना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली व “पुन्हा इकडे कशाला आली? ही जागा आमची आहे, तुम्ही आमच्या जागेवर कब्जा करता काय?” असे म्हणून वाद घातला.
  • विनयभंग व मारहाण: त्यानंतर आरोपी क्र. २  जवळ आला व त्याने फिर्यादींचा पदरा ओढल्याने त्यांची साडी फाटली. त्यानंतर त्यांना धक्का देऊन खाली पाडले. आरोपी क्र. २  ने फिर्यादींच्या उजव्या पायावर लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली.
  • पतीला मारहाण: त्यावेळी फिर्यादींचे पती दीपक व मुलगी सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. आरोपी क्र. १ ने फिर्यादी व त्यांच्या पतीला गळा पकडून मारहाण केली.

 

धमकी देऊन पलायन

 

फिर्यादींची लहान मुलगी भांडण सोडवण्यासाठी आली असता, आरोपी क्र. १ ने तिचा गळा पकडून तिची टी-शर्ट फाडून तिला जमिनीवर ढकलले. त्यानंतर दोन्ही आरोपी “ये चांभारड्यांनो, पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुमच्या मुलींना नांगड्या करेन,” अशी धमकी देऊन तेथून निघून गेले.

सपोनि श्री. सचिन कदम चाकण विभाग यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!