33
पुण्यानंतर सोलापूरमध्ये IT पार्कची घोषणा! – मुख्यमंत्र्यांनी केला मोठा ऐलान
महाराष्ट्रातील दुसरे तर देशातील तिसरे मोठे ITपार्क सोलापूरला मिळणार; १५०० एकरवर नवा प्रकल्प उभारण्याची तयारी
सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी, १६ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुण्यानंतर आता सोलापूरमध्ये महाराष्ट्रातील दुसरे आणि देशातील तिसरे मोठे IT पार्क स्थापन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ सोलापूर येथे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरु विमानसेवांचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत झाले, त्याचवेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही लवकरच सोलापूरमध्ये एक चांगले ITपार्क विकसित करू. सध्या पुण्यात असलेल्या सोलापूरच्या मुलांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील.“
कुंभारी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये IT पार्क उभारण्याची तयारी आधीच सुरू झाली होती. CM फडणवीस यांनी IT पार्कसाठी योग्य जागा शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी MIDC अधिकाऱ्यांना जागा शोधून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
-
प्रस्तावित जागा: शहरापासून ८ ते १० कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभारी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता.
-
जमीन आणि खर्च: या वसाहतीसाठी ९६४ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना होती आणि त्यासाठी Rs.२४ कोटींची मागणीही करण्यात आली होती, मात्र हा प्रस्ताव प्रलंबित होता. आता हा प्रस्ताव नव्याने सादर केला जाईल.
-
नवा शोध: कुंभारीMIDC व्यतिरिक्त, सोलापूर-पुणे आणि सोलापूर-विजापुरा महामार्गाजवळ सरकारी आणि खासगी जमिनीचा शोध घेतला जाणार आहे.
