news
Home अकोला ‘सण-उत्सवातील खर्च टाळून आत्मिक समाधान’! – ‘ज्ञान नर्मदा’ आणि ‘हॅपी वुमन्स क्लब’चा सिरसो गायरान येथील दिव्यांगांना दिवाळीचा आधार

‘सण-उत्सवातील खर्च टाळून आत्मिक समाधान’! – ‘ज्ञान नर्मदा’ आणि ‘हॅपी वुमन्स क्लब’चा सिरसो गायरान येथील दिव्यांगांना दिवाळीचा आधार

कुष्ठरोगी बांधवांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद; सुनिता लोडम, रूपाली तिडके, डॉ. स्वाती पोटे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मानवतेची दिवाळी! ‘ज्ञान नर्मदा’ संस्थेचा पुढाकार, दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी

 


 

मूर्तीजापूर येथील ‘हॅपी वुमन्स क्लब’कडून कुष्ठरोगी आणि गरीब बांधवांना दिवाळी फराळ, मिठाई व फटाक्यांचे वाटप

 

मूर्तीजापूर, प्रतिनिधी विलास सावळे, दि. २२ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तीजापूर येथील ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हॅपी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सुनिता लोडम यांच्या पुढाकाराने यंदा दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाने संस्थेने मानवतेचा परिचय दिला आहे.
ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात, ज्यात राजमाता जिजाऊ जयंती उत्सव, जागतिक महिला दिन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि होतकरू महिलांचा सत्कार यांचा समावेश असतो.

सिरसो गायरान येथील दिव्यांगांना आनंद

 

संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळी सिरसो गायरान येथील कुष्ठरोगी, दिव्यांग आणि गरीब गरजू बांधवांना सोबत घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी या बांधवांना दिवाळी फराळ, मिठाई, केक तसेच फुलझडी फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाने कुष्ठरोगी आणि दिव्यांग बांधवांनी तसेच लाडक्या बहिणी व भावांनी मोठा आनंद व्यक्त केला, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.

संस्थेचे संस्थापक विष्णू लोडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की, सण-उत्सवामध्ये व्यर्थ खर्च न करता, अशा प्रकारे समाज उपयोगी उपक्रमाद्वारे आत्मिक समाधान मिळते. त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने सुनिता लोडम, रूपाली तिडके, डॉ. स्वाती पोटे, क्षमा इंगळे, दिपाली देशमुख, कविता साखरे, माया दवंडे, कल्पना तिडके, डॉ. अनुष्का तिडके, ममता मालानी, नंदिनी प्रेम शर्मा, कु. विभूती लोडम, अतुल गावंडे, प्रेम शर्मा, विलास सावळे, पंकज मेश्राम इत्यादी उपस्थित होते.
यावेळी हॅपी वुमन्स क्लबच्या महिला पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. दिपाली देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!