news
Home पिंपरी चिंचवड मोहोळमधील पूरग्रस्तांची दिवाळी झाली ‘आनंददायी’; वाकडच्या ‘आनंद जेष्ठ नागरिक संघा’ने दिले जीवनावश्यक वस्तू आणि रोख १५००/- रुपयांचे पाकीट

मोहोळमधील पूरग्रस्तांची दिवाळी झाली ‘आनंददायी’; वाकडच्या ‘आनंद जेष्ठ नागरिक संघा’ने दिले जीवनावश्यक वस्तू आणि रोख १५००/- रुपयांचे पाकीट

'वेदना जागवते संवेदना' हे ब्रीद सार्थ; मुरलीधर लहाने, सुरेश बोरकर, माधव बराटे यांच्यासह सभासदांचे कृतिशील कार्य. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

माणुसकीचा झरा! पूरग्रस्तांच्या मदतीला धावले वाकडचे ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघ’

 


 

सोलापूर जिल्ह्यातील घाटणे गावातील ११० कुटुंबांना दिवाळी आनंदात जाण्यासाठी ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघा’तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे ७५ किटचे वाटप

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

‘वेदना जागवते संवेदना! त्या संवेदनेतून जेव्हा कृतिशील कार्य घडते, तेव्हा अर्थातच नावलौकिक वाढतो.’ याच उक्तीप्रमाणे पोस्टल कॉलनी, वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने समाजहिताचे भरीव कार्य केले आहे.
“माणुसकीचा झरा, हाच आहे संघाचा इरादा!” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत या संघाने ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला काहीतरी देणे लागतो, या भावनेतून महत्त्वपूर्ण मदत केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील, सीना नदीच्या काठी वसलेल्या घाटणे गावातील महापुराने वाताहत झालेल्या ११० उद्ध्वस्त उंबरठ्याना दिवाळी आनंदात साजरी करता यावी, यासाठी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने मदतीचा हात देऊन कृतार्थ झाले.

या कार्यासाठी संघाने रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी जीवनावश्यक वस्तू असलेले एकूण ७५ किट तयार केले. या प्रत्येक किटमध्ये:
५ किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो साखर, एक लिटर गोड तेल, अर्धा किलो तूर डाळ, अर्धा किलो मूग डाळ, पावशेर चहा पावडर, दोन बिस्कीट पुडे, मिठाईचा बॉक्स, वासाचे तेल. उटणे, अंगाचा साबण, आकाश कंदील, आणि रु. १५०० चे रोख पाकीट या सर्व वस्तूंचा समावेश होता. संघाच्या सभासदांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या घरी जाऊन या किटचे वाटप केले. मिळालेल्या या सर्वांगसुंदर मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाल्याने संघाच्या कष्टाचे सार्थक झाले, असे आयोजकांनी सांगितले.
या कार्यासाठी संघाने पूरग्रस्त निधी संकलन समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज मुरलीधर लहाने यांच्या अध्यक्षतेखालील सभासदांच्या साथीने पार पडले.
  • समिती सदस्य: सुरेश बोरकर, माधव बराटे, अशोक बोंडे, अप्पासाहेब तेली, श्रीकांत रेवणवार, रामचंद्र कळमकर, सुभाष वाणी, सुभाष चौधरी, सुधाकर जगताप, आसावरी लहाने, अलका कळमकर, संगीता साठे, प्रतिभा गवळी, आणि विभा दरेकर.
यासाठी सहसचिव अप्पासाहेब तेली, प्रवीण कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. तसेच, संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली हे कार्य पूर्ण झाले.
घाटणे गावातील श्री ऋतुराज देशमुख (सरपंच), श्री मुकुंद देशमुख (पोस्ट मास्तर), श्री रवींद्र जाधव (आरोग्य खाते), रुपाली पाटणे (आशा वर्कर) यांचेही सहकार्य आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला मिळाले.
अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्री अशोक बोंडे आणि सौ हेमांगी बोंडे यांनी कळवली आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!