news
Home अमरावती ₹१,११७ कोटींची विशेष मदत! – अमरावती जिल्ह्याला विक्रमी निधी; पीक नुकसान व रब्बी हंगामासाठी ₹५४७ कोटींचे जीआर जारी

₹१,११७ कोटींची विशेष मदत! – अमरावती जिल्ह्याला विक्रमी निधी; पीक नुकसान व रब्बी हंगामासाठी ₹५४७ कोटींचे जीआर जारी

राज्यात केवळ अमरावती जिल्ह्याला विशेष निधी प्राप्त; सततच्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अमरावती जिल्ह्याला बंपर मदत! शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ₹१,११७ कोटींचा विक्रमी निधी मंजूर

 


 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यात केवळ अमरावती जिल्ह्याला विशेष मदत

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ३० ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज

सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी ₹१,११७ कोटी ८५ लाख (अंदाजित) रुपयांचा मोठा मदतनिधी जाहीर केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात केवळ अमरावती जिल्ह्याला हा विशेष निधी प्राप्त झाला आहे.

या निधीमुळे जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाने मदतीचा निकष दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढवल्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने दोन स्वतंत्र शासकीय निर्णय (GR) जाहीर केले आहेत:

  • १. पीक नुकसानीपोटी नियमित मदत (₹५७० कोटी):
    • जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे.
    • या अंतर्गत ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांची ४ लाख ८१ हजार ५०३ हेक्टर जमीन बाधीत झाली होती, यासाठी सुमारे ₹४९० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.
    • शासनाने मदतीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केल्यामुळे ५५ हजार २१२ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ३७३ हेक्टरसाठी अतिरिक्त ₹७९ कोटींचा निधी प्राप्त होईल.
  • २. रब्बी हंगामासाठी विशेष मदत (₹५४७ कोटी):
    • नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी विशेष मदत म्हणून प्रति हेक्टरी ₹१० हजार अर्थसहाय्य देण्याचा निर्णय १० ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता.
    • या निर्णयानुसार, सप्टेंबर २०२५ मधील कालावधीत बाधीत झालेल्या ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांच्या ५ लाख ४७ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रासाठी जिल्ह्याला ₹५४७ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी वेळेत प्रस्ताव सादर केले होते. या दोन शासन निर्णयांमध्ये राज्यातून एकमात्र अमरावती जिल्ह्याला विशेष मदत जाहीर झाल्याने जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!