डोजबॉलमध्ये पिं. चिं.चा दबदबा! मुलांमध्ये पिंपरी-चिंचवड, मुलींमध्ये पुणे संघ प्रथम
राज्यस्तरीय सब ज्युनिअर स्पर्धा एच.ए. स्कूल पिंपरी येथे संपन्न; ३६ जिल्ह्यांतील ६०० खेळाडू सहभागी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरावी राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धा २०२५ पिंपरी येथील एच.ए. स्कूलमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात पिंपरी चिंचवड संघाने तर मुलींच्या गटात पुणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
पिंपरी चिंचवड डॉजबॉल असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ३६ जिल्ह्यांमधून ६०० खेळाडू सहभागी झाले होते.
| गट | प्रथम क्रमांक | द्वितीय क्रमांक | तृतीय क्रमांक |
| मुले | पिंपरी चिंचवड | ठाणे | जळगाव |
| मुली | पुणे सिटी | पिंपरी चिंचवड | मुंबई उपनगर |
- मुली: मानसी चव्हाण
- मुले: सुरज ढमढेरे
सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मानसी चव्हाण आणि सुरज ढमढेरे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेच्या पारितोषिक समारंभ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, डी ई एस पुणेचे अध्यक्ष अशोक पालांडे, कामगार नेते कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, राहुल जवळकर, संतोष कांबळे, वैशाली जवळकर, आदेश नवले, गणपतराव बालवडकर, कमलाकर डोके, प्रसाद दोमाले, नितीन कदम पाटील, गिरीश पाटील, निलेश गवांदे, प्रदीप साखरे, दीपक कन्हेरे, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, सुनील शिवले, पो. निरीक्षक अलका सरग, राजेश माघाडे, मुख्याध्यपिका दर्शना कोरके आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पिं-चिं असोसिएशनचे अध्यक्ष सत्यवान वाघमोडे, कार्याध्यक्ष मुकेश पवार, सचिव रामेश्वर हराळे, उपाध्यक्ष सचिन नाडे, सहसचिव जीवन सोळंके, तसेच चंद्रशेखर कुलकर्णी, भगवान सोनवणे, मिलिंद माथने, शिवाजी बांदल, शेखर कुदळे, भटू शिंदे, साहेबराव जाधव, श्रीकांत देशपांडे, मधुकर रासकर, विजय टेपागुडे, संकेत साळुंखे, दळवी सर, डॉ. सुवर्णा घोलप, सुषमा पवार, सुजाता चव्हाण, भावना पायमोडे यांनी केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
