news
Home अकोला मातंग समाजाचा ‘राजकीय न्याय’ कोणाकडे? – लाखपुरी जि.प. सर्कलसाठी ‘गजानन तायडे’ यांना उमेदवारी देण्याची वंचितकडे मागणी

मातंग समाजाचा ‘राजकीय न्याय’ कोणाकडे? – लाखपुरी जि.प. सर्कलसाठी ‘गजानन तायडे’ यांना उमेदवारी देण्याची वंचितकडे मागणी

तेरा दिवसांची 'मातंग समाज संघर्ष यात्रा' यशस्वी; आरएसएस आणि भाजपने केलेले गैरसमज दूर करून 'फुले, शाहू, आंबेडकर' यांच्या विचारांना बळ देण्याची अपेक्षा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

लाखपुरी सर्कलसाठी ‘गजानन तायडे’ यांना उमेदवारी द्या! वंचित बहुजन आघाडीकडून मातंग समाजाला राजकीय न्यायाची अपेक्षा

 


 

सुजात आंबेडकर यांच्याकडे मूर्तिजापूर मातंग समाजाची मागणी; अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या अध्यक्षांना संधी देण्याची मागणी

 

अकोला ,प्रतिनिधी प्रतिनिधी : विलास सावळे, दि. १ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांच्याकडे मातंग समाजाने मोठी राजकीय मागणी केली आहे. लाखपुरी जिल्हा परिषद सर्कलसाठी गजानन तायडे यांना उमेदवारी देऊन मातंग समाजाला राजकीय न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी समाजाकडून करण्यात येत आहे.

 

मातंग समाजाला आजपर्यंत खऱ्या अर्थाने फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना राजकीय न्याय मिळालेला नाही. त्यामुळे, हा न्याय सुजात आंबेडकर यांच्याकडून निश्चित मिळेल, अशी अपेक्षा मातंग समाज व्यक्त करत आहे.

गजानन तायडे यांची पार्श्वभूमी:

  • ते अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष आहेत.
  • ते वंचित बहुजन आघाडीचे पूर्णकालीन प्रचारक म्हणून कार्यरत आहेत.
  • त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य बळकट करत आहेत.

संपूर्ण मूर्तिजापूर मातंग समाजाची मागणी आहे की, गजानन तायडे यांनाच लाखपुरी सर्कलसाठी उमेदवारी मिळावी. तायडे हे लाखपुरी सर्कल मधून वंचित बहुजन आघाडीसाठी समाजाचे इच्छुक उमेदवार आहेत.

मातंग समाज हा खऱ्या अर्थाने वंचित आहे. आरएसएसभाजपने मातंग समाजाला आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी विषयी मोठे गैरसमज निर्माण केले होते. हे गैरसमज पुसून काढण्याच्या उद्देशाने मध्यंतरी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या सप्ताहात गजानन तायडे यांच्या नेतृत्वाखाली तेरा दिवसांची ‘मातंग समाज संघर्ष यात्रा’ जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. यामुळे समाजात वंचित बहुजन आघाडीवर विश्वास निर्माण झाला आहे.

आता या महत्त्वपूर्ण विषयाकडे वंचित बहुजन आघाडी लक्ष देऊन गजानन तायडे यांच्या रूपाने मातंग समाजाला न्याय देणार का, याकडे संपूर्ण समाजाचे अशापूर्ण लक्ष लागलेले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!