news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home अकोला १००% शास्ती माफी! – मूर्तिजापूरकरांना दिलासा; १४ नोव्हेंबरपर्यंत कर भरा आणि व्याजातून मुक्त व्हा

१००% शास्ती माफी! – मूर्तिजापूरकरांना दिलासा; १४ नोव्हेंबरपर्यंत कर भरा आणि व्याजातून मुक्त व्हा

आमदार हरीश भाऊ पिंपळे, तत्कालीन मुख्याधिकारी श्री टाले साहेब आणि सह आयुक्त श्री विजय लोहकरे साहेब यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मूर्तिजापूर नगरपरिषदेची ‘अभय योजना’ जाहीर! थकीत मालमत्ता करावरील शास्ती व्याजावर १००% सूट

 


 

माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार यांच्या पाठपुराव्याला यश; लाभ घेण्यासाठी अंतिम मुदतवाढ आता १४ नोव्हेंबर २०२५

 

मूर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे, दि. नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तिजापूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेने थकीत मालमत्ता करावरील शास्ती व्याजावर १००% टक्के सूट देणारी “अभय योजना” लागू केली आहे. या योजनेत मूर्तिजापूर नगरपरिषदेचा समावेश झाल्यामुळे हजारो नागरिकांना त्यांच्या थकीत करावरील शास्ती माफ करून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

 

थकीत मालमत्ता करावरील शास्ती व्याजावर १००% सूट मिळवणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे (यापूर्वी ही मुदत २० ऑक्टोबरपर्यंत होती).

अभय योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

  • सवलत: थकीत मालमत्ता करावरील दरमहा २% दराने आकारले जाणारे शास्ती व्याज १००% पूर्णतः माफ होणार.
  • अंतिम मुदत: योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे.
  • लाभ घेण्याची प्रक्रिया: थकीत मालमत्ता धारकांनी दरमहा २% शास्ती/व्याजाची रक्कम वगळून, थकीत कराची मूळ रक्कम १४/११/२०२५ पर्यंत भरणा करणे आवश्यक आहे.

राज्यातील महानगरपालिकांच्या धर्तीवर मूर्तिजापूर नगरपरिषदेतही ही योजना लागू व्हावी, यासाठी माजी उपनगराध्यक्ष सुनील महादेराव पवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याला अखेर यश मिळाले आहे.

सुनील पवार यांनी सांगितले:

“राज्यातील महानगरपालिकांमध्ये अधिनियम कलम ५१ अंतर्गत ज्या प्रकारे अभय योजना राबविण्यात आली, तशीच योजना महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (अ). १ नुसार शास्ती व्याज माफीसाठी मूर्तिजापूर नगरपरिषदने लागू केली आहे. थकीत करावरील शास्ती व्याज माफ करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी श्री टाले साहेब, माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे आणि तत्कालीन सह आयुक्त नगरपरिषद प्रशासक अकोला श्री विजय लोहकरे साहेब यांनीही शासन दरबारी कागदपत्रांचा पाठपुरावा केला. या सामूहिक प्रयत्नांमुळेच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.”

नागरिकांसाठी सुट्टीच्या कालावधीत व नंतरही शासकीय सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी माजी उपनगराध्यक्ष सुनील महादेवराव पवार यांनी नगरपरिषदेकडे आणि नगरपरिषदेने शासनाकडे विशेष पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता धारकांनी तातडीने नगरपरिषदेच्या कर विभागाशी संपर्क साधून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!