ब्लॅक फॉर्च्युनरमधून गोळीबार करून खून: दिघीतील नितीन गिलबिले खूनप्रकरणी दोन फरार आरोपींना बेड्या
शस्त्राचा परवाना आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ते कसे आले, याचा सखोल तपास सुरू. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.)
पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले (प्रतिनिधी):
दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ब्लॅक रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून झालेल्या गोळीबार प्रकरणात नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी-चऱ्होली) या व्यक्तीचा खून करण्यात आला होता. या गंभीर आणि थरारक घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, या प्रकरणातील दोघे फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

या घटनेनंतर पोलिसांनी सर्वात आधी मयत नितीन गिलबिले याचे मित्र अमित जीवन पठारे (वय अंदाजे ३५, रा. पठारे मळा) आणि विक्रांत ठाकूर (रा. सोलू, खेड) यांना अटक केली होती.
तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी गुन्ह्यात सामील अजून दोन आरोपींचा शोध घेतला. अखेर दिघी पोलिसांनी या प्रकरणात फरार असलेले सुमित पटेल आणि आकाश पठारे या दोघांना बेड्या ठोकत अटक केली आहे. या घटनेतील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

खूनप्रकरणात वापरण्यात आलेली ब्लॅक कलरची फॉर्च्युनर गाडी (MH 14 LL 8900) दिघी पोलिसांनी जप्त केली आहे.
या खूनप्रकरणात वापरलेले शस्त्र (Weapon) मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सदर शस्त्र नेमके कुठून मिळाले, त्याचा परवाना (License) होता की नव्हता आणि ते पिंपरी-चिंचवड शहरात कसे आणले गेले? — या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
