news
Home पिंपरी चिंचवड पुणे-पिंपरीसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा टप्पा: मतदार यादी प्रसिद्धीसाठी २२ डिसेंबर २०२५ ही नवी तारीख

पुणे-पिंपरीसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा टप्पा: मतदार यादी प्रसिद्धीसाठी २२ डिसेंबर २०२५ ही नवी तारीख

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकांणी यांचे पत्र; हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख आता ०३ डिसेंबर २०२५. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मोठा बदल! मतदार यादीच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारणा

 

प्रारूप यादीवरील हरकती, अंतिम यादी प्रसिद्धी आणि मतदान केंद्र यादीच्या तारखा बदलल्या; महानगरपालिका आयुक्तांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सुधारित केला आहे. यासंबंधीचे पत्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र चे सचिव सुरेश कांकांणी यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व महानगरपालिका आयुक्तांना पाठवले आहे.

या सुधारित कार्यक्रमानुसार, मतदार यादीच्या विविध टप्प्यांच्या पूर्वीच्या निर्धारित तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेले मतदार यादीशी संबंधित सुधारीत कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:

 

अ.क्र. निवडणुकीचा टप्पा दि. १३/११/२०२५ च्या पत्रानुसार निर्धारित केलेला दिनांक सुधारीत दिनांक
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२५ ०३/१२/२०२५
प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे ०५/१२/२०२५ १०/१२/२०२५
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करणे ०८/१२/२०२५ १५/१२/२०२५
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे १२/१२/२०२५ २२/१२/२०२५

मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास, संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी श्री. समीर गंदपवार (संगणकीकरण कक्ष) यांच्याशी ई-मेलद्वारे (sec.compu@mah.gov.in ) संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८८६९५० / २२०२२९०९ वर संपर्क साधावा, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

हा मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार हा बदल सुरेश कांकांणी  यांनी त्वरित लागू करण्याची सूचना केली आहे.

 


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!