news
Home पिंपरी चिंचवड ‘सन्मानाने जगण्याचा हक्क’ देणाऱ्या संविधानाचा गौरव; चिखली घरकुल वासीयांनी सामूहिक वाचनातून जपला राष्ट्रीय एकात्मतेचा निर्धार

‘सन्मानाने जगण्याचा हक्क’ देणाऱ्या संविधानाचा गौरव; चिखली घरकुल वासीयांनी सामूहिक वाचनातून जपला राष्ट्रीय एकात्मतेचा निर्धार

भोसरी विधानसभा उपाध्यक्ष संतोष माळी, सचिव दशरथ शिंदे, संचालक निर्जला चौधरी, मार्गदर्शक संचालक भगवान पारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिखली घरकुल येथे संविधानाचा जागर! नागरिकांनी पिरॅम्बल वाचून ७५ वा संविधान दिन केला उत्साहात साजरा

 

भारतीय संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांच्या जबाबदारीवर मार्गदर्शन; सुजाता ताई विधाते आणि अशोक मगर यांची प्रमुख उपस्थिती

 

चिखली, प्रतिनिधी श्याम सोनवणे , दि. २७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी चिखली, घरकुल या ठिकाणी ७५ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या मूल्यांचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण घरकुल वासी एकत्र आले आणि त्यांनी संविधान प्रस्ताविकेचे (Preamble) वाचन करून संविधान दिनाचा गौरव केला.

या कार्यक्रमाचे आयोजन फेडरेशन ऑफ घरकुल आणि सम्यक क्रांती संघ घरकुल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ओबीसी विभागाच्या महिला अध्यक्ष सुजाता ताई विधाते आणि चिखली घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याव्यतिरिक्त, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष संतोष माळी, सचिव दशरथ शिंदे, संचालक निर्जला चौधरी, मार्गदर्शक संचालक भगवान पारे तसेच प्रमुख पाहुणे सुभेद साबळे सम्यक क्रांती संघटनेचे अध्यक्ष दशरथ शिंदे फेडरेशन ऑफ घरकुल वंदना जावळे, भगवान पारे, सादिक शेख, आसिफ भाई, गणेश वारुळे, दत्ता कांबळे, उत्तम साबळे, महेश सावंत,  संभाजी गोरे, संभाजी बोडके, अनिता बागडे, गायकवाड मॅडम, इंगवले मॅडम इतर समिती पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने घरकुल वाशियांनी उपस्थिी दर्शविली.

यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांची असलेली जबाबदारी याबद्दल उपस्थितांना थोडक्यात मुद्देसूदपणे माहिती देण्यात आली.

संविधानाचे महत्त्व नागरिकांची जबाबदारी
१. मूलभूत हक्कांची हमी: संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्ध हक्क असे मूलभूत अधिकार दिले आहेत, ज्यामुळे सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. १. संविधानाचे पालन: प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे बंधनकारक आहे.
२. लोकशाहीचा आधार: भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून कार्यरत राहण्यासाठी संविधान हाच आधारस्तंभ आहे. २. राष्ट्रीय एकात्मता: बंधुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी, तसेच देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
३. सामाजिक न्याय: सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करणारी मार्गदर्शक तत्त्वे संविधानाने दिली आहेत. ३. मूलभूत कर्तव्यांचे पालन: केवळ हक्कच नव्हे, तर पर्यावरणाचे संरक्षण, सार्वजनिक मालमत्तेची जपणूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे यांसारख्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे.

या सामूहिक वाचनातून आणि मार्गदर्शनातून घरकुलवासीयांनी भारतीयत्व आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार केला.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!