news
Home पिंपरी चिंचवड २ कोटी १० लाखांची फसवणूक: शेअर मार्केटच्या आमिषाने ‘Binance USDT’ मध्ये पैशांचे हस्तांतरण! सायबर पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद येथून दोघांना ठोकल्या बेड्या

२ कोटी १० लाखांची फसवणूक: शेअर मार्केटच्या आमिषाने ‘Binance USDT’ मध्ये पैशांचे हस्तांतरण! सायबर पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद येथून दोघांना ठोकल्या बेड्या

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; पोलीस निरीक्षक रविकिरण नळे, सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि वैभव पाटील यांच्या पथकाची उत्कृष्ट कामगिरी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई! ₹२.१० कोटींच्या क्रिप्टो ट्रेडिंग फसवणुकीतील मुख्य आरोपीला अहमदाबाद विमानतळावरून अटक

 

टेलीग्राम ग्रुप आणि ‘शालार्थ आयडी’च्या नावावर गंडा घालणारे आंतरराज्यीय रॅकेट उघड; देशभर २६ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी उघड

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस स्टेशनने क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि बनावट बँक खात्यांचा वापर करून ₹२,१०,०४,७९४/- (दोन कोटी दहा लाख चार हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये) रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या पथकाने थेट मुंबई आणि अहमदाबाद विमानतळावर धाव घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे.

या गंभीर गुन्ह्यामुळे देशभरातील सुमारे २६ नागरिकांची फसवणूक झाली असून, फसवणुकीची एकूण रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे.

फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना ’85 SC India stock circle’ नावाच्या Telegram ग्रुपमध्ये सामील केले. या ग्रुपमधील ॲडमिन Lata Gupta (युजर आयडी @GGPPLU2) आणि इतरांनी ‘शेअर मार्केट ट्रेडिंग’साठी वेगवेगळ्या लिंक पाठवून जास्त परतावा (रिटर्न्स) मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादींनी या आमिषावर विश्वास ठेवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे पाठवले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर (गु.र.नं. 42/2025) तपास केला असता, आरोपींनी फसवणुकीची रक्कम एका विशिष्ट बँक खात्यातून काढून क्रिप्टोकरन्सीमध्ये (Binance USDT) रूपांतरित करून मुंबई व अहमदाबाद विमानतळ अशा ठिकाणांवरून हस्तांतरित केल्याचे उघड झाले.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून फसवणुकीची रक्कम जमा झालेले Saraswat Bank Account (क्र. 610000000053938) शोधून काढले.

  • पहिला आरोपी: सदर खात्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पथक यांना सांगली येथे पाठवण्यात आले. खात्याची धारक पूनम शिकलगार हिचा शोध घेतला असता, तिने सदर बँक खाते तिचा मित्र मोहम्मद सैय्यद मोहम्मद पटेल यास वापरण्यास दिल्याचे सांगितले.

  • दुसरा आरोपी (मुख्य सूत्रधार): तांत्रिक विश्लेषणाद्वारे समीर गुप्ता नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला असता, तो व्हर्च्युअल नंबर (Virtual Number) वापरत असल्याने त्याची माहिती मिळणे शक्य नव्हते. परंतु, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना समीर गुप्ता हा मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली. सागर पोमण व पथकाने मुंबईत जाऊन त्याचा शोध घेतला असता, त्याचे खरे नाव विशाल ठाकर असल्याचे उघड झाले. त्याने गुन्ह्यात वापरलेला ‘Fortune’ नावाचा बँक अकाउंट Harsh Bhadoria यास दिला होता.

  • तिसरा आरोपी (बँक अकाउंट सप्लायर): पोलीस पथकाने विशाल ठाकर याचा अधिक तपास केला असता, त्याचे खरे नाव हर्ष सुरेंद्रप्रताप भदौरिया (रा. कानपूर, उत्तर प्रदेश) असल्याचे निष्पन्न झाले. तो अहमदाबाद विमानतळाहून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाउंट Fortune नावावर असून, त्याऐवजी त्याने Binance वर USDT (क्रिप्टोकरन्सी) घेतल्याची कबुली दिली.

अटक आरोपींची नावे:

  1. हर्ष सुरेंद्रप्रताप भदौरिया उर्फ Fortune उर्फ पुनीत (वय ३२, व्यवसाय – बँक अकाउंट सप्लायर, रा. कानपूर, उत्तर प्रदेश).

  2. विशाल ठाकर (वय २८, व्यवसाय – शेअर मार्केट ट्रेडिंग, रा. लुईसवाडी, ठाणे).

आरोपींकडून ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींनी फसवणूक केलेल्या रकमेपैकी एकूण १२ लाख रुपये रोख स्वरूपात घेतल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपींनी इतरांच्या मदतीने आतापर्यंत संपूर्ण देशातील विविध राज्यांतील २६ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारित) कायदा २००८ चे कलम 66(C), 66(D) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची महत्त्वपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मा. डॉ. शशिकांत महावरकर (सह पोलीस आयुक्त), मा. सारंग आव्हाड (अपर पोलीस आयुक्त), मा. डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप-आयुक्त गुन्हे), मा. डॉ. विशाल हिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात पोलीस निरीक्षक रविकिरण नळे, सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि सागर पोमण, पोउपनि रोहित डोळे, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोउपनि विद्या पाटील तसेच पोलीस अंमलदार दिपक भोसले, विनायक म्हस्के, हेमंत खरात, सुरज शिंदे, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, संतोष सपकाळ, पंकज धोत्रे, सुरज जाधव, स्मिता पाटील, दिपाली चव्हाण, शिवाजी बनसोडे, स्वप्नील खणसे या सर्व सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!