अमरावती जिल्हा निवडणूक स्थगित! अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदासह ५ नगरपरिषदेतील ८ सदस्य जागांवर तात्पुरती स्थगिती
२२ नोव्हेंबरनंतर अपिलांचा निकाल लागल्याने राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय; सुधारीत कार्यक्रमानुसार होणार मतदान
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीला मोठा ‘ब्रेक’ लागला आहे. अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासह आणि जिल्ह्यातील इतर पाच नगरपालिका व नगरपंचायतीमधील आठ सदस्यपदांच्या निवडणुकीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलांचा निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर लागल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी आशिष यांनी कळविल्यानुसार, आता या जागांवर सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रान्वये नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी अपील दाखल होते आणि या अपिलांचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून २३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा जागांवर ४ नोव्हेंबर २०२५ च्या कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्यात येऊ नये, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
तसेच, जर अशा प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असेल, तर त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या सूचनेनुसार, अमरावती जिल्ह्यातील खालीलप्रमाणे एकूण ८ सदस्य जागा आणि १ अध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे:
-
अंजनगाव (सुर्जी) नगरपरिषद:
-
अध्यक्षपद (संपूर्ण नगरपरिषद निवडणूक स्थगित)
-
जागा क्रमांक ६ अ
-
जागा क्रमांक ७ ब
-
-
दर्यापूर नगरपरिषद: जागा क्रमांक २ अ
-
अचलपूर नगरपरिषद:
-
जागा क्रमांक १० अ
-
जागा क्रमांक १९ ब
-
-
वरुड नगरपरिषद: जागा क्रमांक १२ अ
-
धारणी नगरपंचायत:
-
प्रभाग क्रमांक १४
-
प्रभाग क्रमांक १६
-
या सर्व जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
