news
Home पिंपरी चिंचवड लोकशाही बळकट करण्याचा संकल्प! संत जगनाडे महाराज जयंतीदिनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी आणि नागरिकांनी घेतली ‘मतदान शपथ’

लोकशाही बळकट करण्याचा संकल्प! संत जगनाडे महाराज जयंतीदिनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी आणि नागरिकांनी घेतली ‘मतदान शपथ’

जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले शपथेचे वाचन; सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, ॲड. विशाल डोंगरे यांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापालिका निवडणुकीत १००% मतदानाची शपथ! संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अभिवादन

 

 

विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार; संत जगनाडे महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे:, दि. ८ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

थोर समाजसुधारक संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (दि. ८ डिसेंबर २०२५) त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या अभिवादन कार्यक्रमावेळी एक महत्त्वाचा संकल्प करण्यात आला. उपस्थित शेकडो जणांनी मतदानाची शपथ घेतली आणि येत्या महापालिका निवडणुकीत १००% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मतदानाच्या शपथेचे वाचन केले.

  • उपस्थितांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ घेतली.

यावेळी बोलताना विशेष अधिकारी किरण गायकवाड म्हणाले की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत जगनाडे महाराज यांनी केले. संत जगनाडे महाराजांच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासावा. या माध्यमातून सूजाण नागरिक घडण्यास मदत होईल आणि देश बळकट होण्यास हातभार लागेल.

किरण गायकवाड यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही केले.

यावेळी सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, पुणे महसूल विभागाच्या राज्य समन्वय समितीचे सदस्य ॲड. विशाल डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश अंबिके, अनिल राऊत, विनीत राऊत, संजय जगनाडे, सुनील डोंगरे, प्रदीप सायकर, दिलीप चौधरी, संतोष साखरे, प्रथमेश अंबेरकर, अभिजित भोसले, राहुल खानविलकर, सोनाली खानविलकर, प्रवीण खानविलकर, प्रणाली खानविलकर, विजय अंबेरकर, विनिता अंबेरकर, रवींद्र हरसुलकर, विनीत राऊत, विजय महाडिक, रोहित राऊत, राजाराम वंजारे तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!